लैंगिक जीवनात अनेकांना येऊ शकतात ‘या’ कॉमन समस्या!

वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे लैंगिक आयुष्य चांगले असेलच असे नसते. अनेकदा जोडीदारासोबत काही समस्या उदभवू शकतात. अशात त्यांच्यात यावरुन काहीना काही वाद होतात. कधी कधी बेडरुममधील हा वाद इतका वाढतो की, जोडीदार एकमेकांना सहनही करु शकत नाहीत. लैंगिक जीवनातील या काही समस्या या सेक्शुअल कारणांनी होतात असे नाही.

तज्ज्ञ सांगतात की, जास्तीत जास्त लैंगिक विषयासंबंधी समस्या या नॉन सेक्शुअल कारणांनी होतात. तज्ज्ञांच्या मते लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये नेमक्या कोणत्या समस्या येतात बघूया .जोडीदारांना खालील प्रकारच्या काही कॉमन समस्यांचा सामना करावा लागतो.

लैंगिक क्षमता

लैंगिक क्षमता हि बऱ्याचदा तुमच्या नात्यात कटुता आणणारी ठरू शकते. या समस्येचा कोणत्याही नात्यावर फार जास्त काळासाठी प्रभाव राहतो. उदाहरणार्थ तुमची लैंगिक क्षमता जास्त असेल आणि तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे असतील. पण असही होऊ शकतं की, तुमच्या जोडीदाराची लैंगिक क्षमता कमी असेल आणि तुमच्या होकारावर काही प्रतिक्रियाच देत नाही. हा फरक असल्याने अडचण समजून घेण्याऐवजी जोडीदारांमध्ये वाद होतात.

हि कॉमन समस्या टाळण्यासाठी जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक क्षमता समजून घेऊन त्यानुसार संबंध ठेवले पाहिजेत. ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहील.

पुढाकार न घेणे

ज्या जोडप्यांनी त्यांचं लैंगिक जीवन नुकतंच सुरु केलं असेल त्यांच्यासाठी ही मोठी समस्या ठरु शकते. वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकता नवीन जोडप्यांसाठी बाधक ठरते. कम्युनिकेशनचा गॅप असतो . ज्यामुळे दोघांपैकी कुणी कधी आणि कितीवेळा लैंगिक क्रियेसाठी पुढाकार घ्यावा यावर कधीच कुणी बोलत नाही. पुढाकार न घेणे याला तुमची/तुमचा पार्टनर शारीरिक संबंधात रस नसणे असंही समजू शकतो. यानंतर दोघांमध्ये समस्या सुरु होतात.

दोघांचा दृष्टीकोन

शारीरिक संबंधाबाबत जोडीदाराचा दृष्टिकोन अगोदर समजून घेणे आवश्यक आहे. याबाबतीत दोघांचाही दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला काहीतरी नवीन प्रयोग करायचा असेल आणि तुमचा जोडीदार केवळ भावनात्मक स्तरावर फोकस करत असेल तर दोघांमध्ये समस्या होऊ शकते. अशावेळी दोघांनीही संवादातून ही समस्या सोडवणे आणि योग्य ते पर्याय निवडणे योग्य ठरते.

काही गोष्टींची भीती

अनेक लोक असे असतात जे शारीरिक संबंधाबाबत आधीच इतकं काही वाचतात की, त्यांच्या मनात संभ्रमता तयार होते. उदाहरणार्थ दोघांपैकी एकाला काही करायचं, पण त्या गोष्टीबाबत दुसऱ्या जोडीदाराच्या मनात साशंकता किंवा भीती असू शकते. तसेच दोघांपैकी एकाला मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे हानिकारक वाटत असेल आणि दुसऱ्याला तसं करायचं असू शकतं. पण तसं नाही झालं तर वाद होतात. अशावेळी संवाद महत्त्वाचा ठरतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *