ज्या ठिकाणी भारताचे स्वातंत्र्य अजूनही पोहचले नाही त्या ठिकाणी जगलेले ते 2 दिवस..

जगण्याचा आनंद अनुभवला-

गेले दोन दिवस अशा एका ठिकाणी आमच्या जाणता युवा फाउंडेशन NGO च्या माध्यामातुन जाण्याचा योग आला ज्याठिकाणी अजुनही भारताचे स्वातंत्र पोहोचले नाही. ऱाजमाची किल्ला , लोनावळा जवळील जंगलातील एक गाव म्हणजे वन्हाटी गाव. जिथे अजुनही लाइट नाही, रस्ता तर नाहीच, कुडाच्या झोपड्यांत राहणारे आदिवासी , ठाकर, कातकरी लोकं.

इतक्या कडाक्याच्या थंडीत पोरांच्या अंगावर स्वेटर काय साधी चड्डि बनेल पन नाही. लाकडे गोळा करुन विकन्यापलिकडे कोणतेही उपजिविकेचे साधन नाही. इथे ना जनधन योजना आहे , ना राशन कार्ड वर मिळनारे सामान आहे. आधार कार्ड आहेत तर मोबाइल नसल्याने ते लिंक नाहीत, लाइट नसल्याने मोबाइल नाहीत, ना गॅस ना हर घर बिजली.

१५ दिवसांपुर्वी सह्याद्रि प्रतिष्ठान चे आमचे मित्र सदानंद पिलाने यांनी हे गाव आम्हाला दाखवले आणि आपन या गावासाठी काहीतरी केले पाहिजे म्हनुन कार्यक्रम आखला. Rajmachi Fort Trek For Noble Cause अशी हाक देत आम्ही सुमारे ५५ उचशिक्षित मुले तिथे सकाळी ११ वाजता गेलो. भारत आणि इंडिया यातला खरा फरक आमच्यातल्या बहुतांश IT कंपन्यमध्ये कामाला असलेल्या सहकाऱ्यांना यावेळी समजुन आला.

सकाळी ट्रेक केल्यावर गावात आलो. तेथील शाळेची झालेली दुरवस्था ठिक करण्याचे पहिले काम हाती घेतले आणि आम्हा सर्व मावळ्यांचे हात रंगाने माखुन शाळा संपुर्ण रंगवून देण्याचे काम चालु केले. १००-१२५ हात काम करु लागल्यावर शिक्षक आणि स्थानिकांनीही मदत केली. आशावादी नजरेने पाहणाऱ्या विद्यार्थी मुला-मुलींनाही खुप बरं वाटलं.

मग संध्याकाळी गावातल्या आदिवासींच्या समस्या व उपाय यावर चर्चा झाली. अक्खं गाव बायका पोरांसहित तिथे हजर होतं. त्यांना सर्वाना नविन जुनी कपडे दिली, सर्वाना स्वेटर- जर्किन दिले, चादरी ब्लँकेट दिली. सर्वांसाठी दुखण्यावर लावन्याचे मूव्ह औषध दिले. लहान मुलांना खोकल्याची औषधे दिली. सर्वांना जेवन बनवुन दिले.

रात्री टेंट मधे थंडीत कुठलेही टेंशन नसणाऱ्या निळ्याशार आकाशाकडे पाहत सर्वजन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा हा उपक्रम राबवला आणि त्यांच्या जिवन जगण्याच्या पद्धति शिकलोत. मानुसकी काय असते याचा अनुभव घेत आम्ही गावातुन निरोप घेतला. २०१९ हे संपुर्ण वर्ष या गावाच्या समस्या सोडवन्यासाठी देण्याचा निर्धार केला.

NGO चे अध्यक्ष राजु माने आणि त्यांच्या IT कंपनीतील सर्व सहकारी, शाळेतील शिक्षक , सरपंच , येवढं सर्व सामान डोक्यावर वाहुन नेनारे सर्व सभासद यांनी २ दिवस कठोर प्रयत्न करुन शाळेचा कायापलट केला.

-उमेश शिंदे जाणता युवा फाउंडेशन (NGO) 9595956004

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *