वारूळचा राजा उर्फ टेकराजचा उपयोग वाचून तुम्ही नक्की अवाक व्हाल…

खेडेभागात जंगली जडीबुटी मोठ्या प्रमाणात चालतात. वेगवेगळे प्राणी वापरून वेगवेगळ्या रोगावर इलाज केल्या जातो. असाच एक प्राणी आहे वारूळचा राजा, उधइचा राजा किंवा टेकराज इत्यादी नावाने या जीवास ओळखतात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या इलाजावर याचा उपयोग केला जातो.

गावाकडे वडर समाज हा खड्डे खोदायचा काम करतो त्यामुळे हा जीव मिळण्याचे हमखास ठिकाण वडराचे गाव हे आहे. मोठ मोठे उधइच्या वारुळात कंबरभर खड्डा खोडून हा राजा काढला जातो. परंतु इंटरनेटवर माहिती काढल्यास तथ्य समोर आले कि हा राजा नसून राणी आहे. हिला Termite Queen असे म्हणतात. उधइचे अंडे द्यायचे काम हि राणी करते.

प्रत्येक वारुळात एक राणी असते आणि हि सतत नवीन अंडी देत असते. एका राणीचे आयुष्य हे २० ते २५ वर्षापर्यंत असते आणि ती सतत १० वर्षापर्यत अंडी द्यायचे काम करते. तिची अंडी देण्याची क्षमता हि कमी असते परंतु दिवसान दिवस ती वाढत जाते. पहिल्या वर्षी १००० अंडी दिलेली राणी लगेच तिसऱ्या वर्षापर्यंत ३ लाखा पर्यंत अंडी देऊ शकते. सर्वात जास्त आयुष्य असलेली हि एकमेव अळी आहे.

आता या मागे विज्ञान काय म्हणते या बाबत माहिती नाही परंतु आजही खेड्यात लोक हा टेकराज कामवर्धक म्हणून वापरतात. अनेकांचे म्हणणे आहे कि यामुळे कंबर चांगली राहते त्यामुळे कामशक्ती वाढते. त्यासोबतच इतर रोगावर सुध्दा हि इलाज म्हणून वापरल्या जाते.

जसे प्रोटीन जास्त प्रमाणात मिळते म्हणून, शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रित करण्याकरिता, उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णा करिता, मुलांची वाढ चांगली होण्याकरिता, वेगवेगळ्या त्वचेच्या आजाराकरिता, डोळ्याच्या चांगल्या दृष्टीकरिता, मधुमेह असलेल्या रुग्णांना, वातरोगावर, मुतखडा झाल्यास, कंबरदुखी, चेहरा आणि केसाकरिता तसेच शरीर सुदृढ करण्याकरिता असे याचे अनेक उपयोग सांगतात. या बाबत एक अंधश्रद्धाहि आहे कि हा जीव खाल्ल्याने पैसा घरात राहतो.

डिस्कवरी चैनेलवर बिअर ग्रील्सच्या कार्यक्रमात अनेकदा तो हा जीव खातानी दाखविला आहे. परंतु तो प्रोटीन मिळण्याकरिता हा जीव खातो. अंतराष्ट्रीय मार्केटमध्ये या राणीला भयंकर मागणी आहे लोक एक लाख रुपयापर्यंत याची देवाण घेवाण करतात. परंतु हे सर्व कायद्यास धरून आहे का नाही याबाबत आम्हाला माहिती नाही. नैसर्गिक वायग्रा म्हणून वयस्कर लोक या टेकराजचा उपयोग करतात.

परंतु हा जीव शोधण्याची पद्धत जीवघेणी आहे. कंबरभर खड्डा करून हा राजा काढल्या जातो. खासरे वरील गोष्टीचे समर्थन करत नाही फक्त हि खासरे माहिती आपल्याकडे पोहचविण्याचे काम करत आहे. त्यामुळे हा जीव कुठे मिळेल किंवा कुठे विकावा या संबधित विचारणा करू नये आणि आम्हाला त्याबाबत माहिती नाही.

उधई घराचे नुकसान करते परंतु याच उधइच्या राणीचा वापर असा केला जातो ऐकावे ते नवलच आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *