हनीमूनला नेमकं कुठं जायचं? हनीमूनसाठी भारतातील 5 सर्वात रोमॅंटिक डेस्टिनेशन

सध्या लग्नाचा सिजन चालू झालाय. लग्न म्हंटलं की अगोदरच्या खरेदीपासून ते लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जायचे या प्रश्नांवर अनेक जण विचारात पडतात. लग्न झाल्या झाल्या नव्या जोडप्यासह सर्वांनाच हनीमूनची उत्सुकता असते. प्रत्येक जोडप्याच्या मनात आपल्या हनीमूनबद्दल अनेक इच्छा आकांक्षा असतात.

लग्नाच्या आधीपासूनच बरेच जण स्पेशल जागेचा शोध घेणं सुरु करतात. पण अनेक दिवस ठिकाणच फायनल होत नाही. त्यामुळे हनीमूनला नेमकं कुठं जायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तशी तर प्रत्येकालाच हनीमूनसाठी परदेशात जाण्याची इच्छा असते. पण सर्वसामान्य कपल्सना ते शक्य होत नाही. त्यामुळे आज आपण भारतातील असे 5 ठिकाणं जाणून घेणार आहोत हे हनिमूनसाठी खूप रोमँटिक आहेत.

5.अलप्पुझा

केरळमधील हे ठिकान कपल्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. दिवसभर चालणा-या या हाऊसबोटवर तुम्हाला हॉटेलच्या रूमसारखी सेवा मिळेल. इथे कपल्स पाण्यात आपला दिवस घालवू शकतात. ही बोट जंगलात तयार झालेल्या कॅनोलमधून जाते.

ज्यामुळे कपल्स निसर्गाचा अगदी जवळून आनंद घेऊ शकतात. यासोबत इथे असलेले हेरिटेज मेंशन आणि वेअर हाऊस या ठिकाणाला परफेक्ट डेस्टिनेशन बनवतात.

4.लडाख

हे ठिकाण नेहमीच प्रत्येकासाठी आकर्षण राहिलं आहे. नवीन लग्न झालेले बहुतांश कपल्स येथे हनिमून साठी जाणे पसंत करतात. या ठिकाणाला लॅंड ऑफ लामा आणि लिटील तिब्बत म्हणूनही ओळखले जाते. येथील डोंगरातील रस्ते, द-या तुमच्यातील उत्साह जागा करतील.

येथे जाण्यासाठी एक समस्या म्हणजे आरोग्याची समस्या असलेल्या लोकांना इथे येण्याआधी हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे. कारण इथे उंच डोंगरात श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3.कसौनी

भारताची राजधानी दिल्लीजवळ असलेलं कसौनी सर्वात लोकप्रिय हनीमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. उत्तराखंडमधील ही जागा हनीमूनसाठी देशभरात चांगलीच लोकप्रिय बनली आहे. नैनीताल आणि अल्मोडा जाणा-या कपल्सनी इथे नक्की जावं.

2.मनाली

मनालीला हनिमून डेस्टिनेशन म्हणून कोण नाही ओळखत. अगदी सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा उआ ठिकाणाची बऱ्यापैकी माहिती असते. हे ठिकाण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिमाचलमधील मनालीत प्रत्येक सीझनमध्ये जबरदस्त वातावरणाचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकतो. हनीमूनसाठी ही जागा सर्वात चांगला पर्याय ठरू शकते.

या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे बर्फांच्या डोंगरातून निघणारी नदी. ही नदी या जागेला अतिशय सुंदर बनवते. यासोबतच इथे राफ्टिंगसोबत ट्रेकिंग आणि स्कीईंगचाही आनंद घेता येईल.

1.शिमला

भारतीयांसाठी हनीमूनसाठी शिमला नॉर्थ इंडियातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. शिमलाला क्वीन ऑफ हिल्स या नावानेही ओळखलं जातं. येथील बर्फांचे डोंगर आणि शांत वातावरण या जागेला परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन बनवण्यासाठी पुरेषे आहेत. यासोबतच स्कीईंग आणि स्केटींगचाही आनंद घेता येतो. इथे कोणत्याही वातावरणात तुम्ही जाऊ शकता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *