महाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर

जगातील सर्वात शाही आरामदायक रेल्वेची यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या यादीत भारतातील महाराजा एक्सप्रेसने पहिले स्थान मिळवीले आहे. ही भारताकरीता अभिमानाची गोष्ट आहे. महाराजा एक्सप्रेसला जगातील अफ्जाधीशांनी प्रवासाकरीता पहिली पसंती दिलेली आहे. जागतीक स्तरावर महाराजा एक्सप्रेस सर्वात चांगली ट्रेन का आहे हे बघुया खासरेवर…

जगात लक्झरी ट्रेनपैकी एक महाराजा एक्सप्रेस आहे. सिंगापुर येथील इस्टर्न ॲण्ड ओरिएंटल ही सुध्दा लक्झरी ट्रेन जगातील प्रसिध्द ट्रेनपैकी एक आहे. महाराजा एक्सप्रेसही फक्त श्रिमंत व शौकीन लोकाकरीता आहे. या ट्रेनमध्ये प्रवासाकरीता १४ कैबिन आहे. ज्यामध्ये ५ डिलक्स केबिन, ६ ज्युनियर सुट , २ सुट व १ मैजिस्टीक प्रेसिडेंशियल सुट आहे. या ट्रेनमध्ये एकावेळेस ८८ प्रवासी प्रवास करु शकतात.

एकुण २३ बोगी या ट्रेन मध्ये आहेत. तुम्हाला विश्वास नाही बसणार या ट्रेनमध्ये २ रेस्ट्रौ व बार आहेत. ज्याची नाव मयुरमहल व जलमहल अशी आहेत. सर्व आत्याधुनिक सुविधा या रेल्वेत उपलब्ध आहेत. वायफाय,टेलिफोन, इंटरनेट,टिव्ही कुठल्याही सुविधेची रेल्वेत कमी नाही आहे. ट्रेनमध्ये सर्वसुविधा असलेले अत्याधुनिक किचन आहे. प्रत्येक बोगीत सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. प्रत्येक बोगीला स्वतंत्र सेवक काम करतो.ट्रेनमध्ये प्रत्येक प्रसंगास वेगवेगळा पेहराव प्रवाश्यास आवश्यक आहे.

महाराजा एक्सप्रेसमध्ये प्रवास करायचा असेल तर त्याकरीता अनेक पॅकेज उपलब्ध आहेत. दिल्ली पासुन आग्रा, फतेहपुर सिक्री-ग्वाल्हेर-रणथंबोर-वाराणसी-लखनौ-जयपुर-बिकानेर-खजुराहो आणि उदयपुर असे ऐतिहासीक स्थळे दाखविण्यात येतात. रात्रीच्या वेळेस प्रवासी रेल्वेमध्येच थांबतात. महाराजा एक्सप्रेसच्या तिकटचा दर खालील प्रमाणे आहे. ४दिवस व ३ रात्री करीता २,७५,००० रुपये ते ८,२५,००० रुपये येवढा आहे.

८ दिवस व ७ रात्री करीता ४,५०,००० रुपये ते १६,००,००० रुपये एवढा आहे. म्हनुन तर ही श्रिमंताची ट्रेन आहे. महाराजा एक्सप्रेस ही पाच प्रकारात प्रवास करते यामध्ये जेम्स ॲाफ इंडिया, हेरीटेज ॲाफ इंडिया, ट्रेजर्स ॲाफ इंडिया, द इंडियन पॅनोरमा आणी इंडियन स्पेंडर टुर यांचा समावेश आहे. या प्रकारानुसार रेल्वे ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाकरीता जाते.

केबिनचे नाव देखील विशेष ठेवन्यात आले आहे. मोती हीरा निलम फीरोजा मुंगा आणि पुखराज असे रत्नाच्या नावावरुन ठेवण्यात आली आहे. भारतात पॅलेस ॲान व्हिल्स, डेक्कन ओडिसी, रॅायल ओरीएंट, फेअरी क्विन, दी गोल्डन चेरीएट, राॅयल राजस्थान ॲान व्हिल्स ह्या काही शाही गाड्या आहेत. दिल्ली-मुंबई-कलकत्ता ह्या प्रवासास महाराज एक्सप्रेसमध्ये सर्वाधीक मागणी आहे. बघा संपुर्ण प्रवासाचा विडीओ

हि खासरे माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *