या एकाच देशात भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आली नाही..

भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया मध्ये तब्बल ७२ वर्षांनी भारताने मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारत हा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ बनला आहे.

कोहलीच्या नेतृत्वात तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा भीम पराक्रम केला. ४ टेस्ट मॅचच्या मालिकेमध्ये भारताचा २-१ नं विजय झाला.

भारतानं आत्तापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं आत्तापर्यंत १२ कसोटी मालिका खेळल्या होत्या पण एकदाही भारताला मालिका जिंकता आली नव्हती. २००३-२००४ साली झालेल्या मालिकेत भारताला मालिका ड्रॉ करण्यात यश आलं होतं. हि मालिका सोडल्यास ऑस्ट्रेलियातल्या इतर सगळ्या मालिकामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये तर कसोटी मालिका विजय भारताने मिळवला. पण अजूनही एक देश असा आहे ज्यामध्ये भारताला कसोटी मालिका जिंकता आली नाही. तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. आफ्रिकेत भारताने एकही कसोटी मालिका जिंकली नाही.

याशिवाय इतर प्रमुख संघाच्या बाबतीत बघायचं झालं तर भारताने नन्यूझीलंडमध्ये ९ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी २ मध्ये विजय, ५ मध्ये पराभव आणि २ मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश आलं होतं. याशिवाय भारताने इंग्लडचे १८ दौरे केले. त्यापैकी ३ मध्ये विजय, १ ड्रॉ आणि बाकी १४ मालिकांत पराभव पदरी पडला.

वेस्ट इंडिजचे भारताने ११ वेळा दौरे केले. ज्यामध्ये भारताने ४ मालिका विजय मिळवले तर ७ वेळा पराभव झाला. पाकिस्तानमध्ये भारतानं आत्तापर्यंत ७ कसोटी मालिका खेळल्या आहेत. यातली २००३-०४ सालच्या एकमेव मालिकेमध्ये भारताचा विजय झाला. तर ३ मालिका पाकिस्ताननं जिंकल्या आणि ३ मालिका ड्रॉ झाल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *