इथे भरते भूतांची जत्रा, सैलानी बाबा बुलढाणा तुम्हाला माहिती आहे का ?

शीर्षक वाचून तुम्ही थोडे दचकले असाल कि भूतांची जत्रा? हो खरी गोष्ट आहे महाराष्ट्रात असे ठिकाण आहे जिथे भरते भूतांची जत्रा हजारो भूत येथे येतात. आणि चांगले होऊन परत जातात. हि गोष्ट आहे बुलढाणा येथील हजरत सैलानी बाबा दर्ग्याची काय आहे या जागेचे विशेष आणि कसा होतो येथे उपचार आज बघूया खासरेवर

करणी भूत बाधा या हे प्रकार खेड्याने जास्त चालतात. लोकांना भूत लागणे आणि ते काढण्या करिता केलेला अघोरी उपचार आपल्याला माहिती नसेल. देशभरात प्रसिद्ध असलेल्या हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेला होळीपासून सुरवात होते. मुख्य उस्तव संपला तरी सतत सात आठ दिवस येथे लोकांची गर्दी असते. सैलानी बाबा या ठिकाणी खेड्यापाड्यातून लोक येतात आणि हे सर्व धर्म समभावाचे ठिकाण आहे.

परंतु इथे चालणारे काम बघितले तर अंगाला काटे येतील. होळीच्या दिवशी येथे लाखो नारळाची होळी पेटविल्या जाते. ज्या व्यक्तीच्या अंगात भूत आलेले आहे करणी झालेली आहे. त्या व्यक्तीच्या अंगावरून लिंबू, खिळे, काळ्या बाहुल्या, सुया टोचलेली नारळे या होळीत फेकली जातात. असे केल्यास व्यक्तीची व्याधी दूर होते अशी भक्तांची धारणा आहे.

सैलानी बाबा, जांभळीवाले बाबा, वाघजाळी व इतर ठिकाणी यापेक्षाही भयंकर प्रकार चालतो. इथे ज्या व्यक्तीच्या अंगात आले आहे यामध्ये जास्त महिलांचा समावेश आहे. त्यांच्या अंगावर लिंबू कापली जातात अंगावर पिळली जातात एवढच काय लिंबू डोळ्यात पिळले जातात. ज्या महिलेच्या अंगात आलेले आहे तिचे केस ओढून तिला भयंकर मारझोड करण्यात येते.

लोकांना भुत लागलेले आहे किंवा कुनी काळी जादु केली आहे व ती उतरवायची आहे या बहान्याने या ठिकानी अनेक अघोरी प्रकार चालतात, त्यांना मारझोडही केल्या जाते, यातना दिल्या जातात,यातुन अनेक जनांचा बळीही या ठिकानी गेला आहे. सुरवातीचा एक मिनटाचा विडीओ झाल्यानंतर येथील अंगात आलेल्या लोकाचे स्वरूप बघून तुमच्या अंगावर काटा येईल.

वाघजाळ येथे महिलांना झाडाच्या छोट्याश्या मुळ्यातून महिलांना टाकल्या जाते. या संपूर्ण झाडावर बाहुल्या, सुया, खिळे, बिबे आणि त्या व्यक्तीची आठवण टांगण्यात येते. सदर घटनेचा विडीओ आपण खाली बघू शकता. महिला देखील इथे आपले केस मोकळे सोडून इथे झुलतात विचित्र आवाज काढतात. मग भूत काढायच्या कारणाने इथल्या रुग्णांना हातापायास बेड्या ठोकून इथे अनेक दिवस ठेवल्या जाते त्याला यातना दिल्या जातात.

हा सर्व प्रकार प्रशासनापुढे घडतो परंतु यावर कुठलाही रोख लावल्या जात नाही किंवा अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या अंतर्गत कार्यवाही केल्या जात नाही. अंधश्रद्धेचे प्रमाण एवढे वाढले आहे कि येथील झाडांना खिळे,बाहुल्या, बिबे ठोकून त्यांना सुध्दा त्रास दिल्या जातो. खालील विडीओ मध्ये फर्स्टपोस्ट हिंदी यांनी चांगल्या प्रकारे येथील सत्य परिस्थती दाखवली आहे आपण ते बघू शकता.

भूत लागणे साधारणत: तीन प्रकारे दिसून येते 1) ढोंगाचा प्रकार 2) स्वयंसूचना 3) मानसिक आजार हे होय.मेंदूमध्ये रासायनिक बिघाड होतात त्यामुळे वर्तनात फरक पडतो त्याला आपण भूत लागले असे समजून मंञतंञ करू लागतो . जर मांञिकावर अशा व्यक्तीचा विश्वास असेल आणि पहिल्याच प्रयोगात ती घाबरली तर ते प्रकार ती थांबवते परंतु पहिल्यांदाच घाबरली नाही तर माञ वाढत जाऊन गंभीर विकृतीमध्ये त्याचे रूपांतर होते.

कित्येकदा अशा मुलींचे,स्ञियांचे मांञिक,बुवा लैगिक शोषण करतात. सैलानी दर्ग्यामध्ये एका मुलीवर असाच बलात्कार झाला होता कोल्हपूरमध्ये मांञिकाने मिरच्याची धुरी देताना निखारे मुलीच्या चेहर्यावर उडून संपूर्ण चेहरा भाजला विक्रोळी पार्कसाईट येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली दोन मांञिक महिलांनी मुलीच्या मानेवर पाय दिला त्यात ती मुलगी दगावली.

भारतात अश्या अनेक दर्गा आहेत जिथे उपचाराच्या नावावर हा अघोरी प्रकार चालतो. अलाहबाद येथील हजरत मुन्नवर अली शाह दर्गा किंवा तमिलनाडु येथील एरवादी मध्ये हजरत सुल्तान सैयद इब्राहिम शहीद दर्गा येथे देखील हा प्रकार चालतो. हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *