अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल, काय आहे मातोश्रीवर जाण्यामागचे कारण?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतो. राज ठाकरे हे अनेक वर्षे झाले होते मातोश्रीवर गेले नाहीयेत. पण आज चक्क राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले आहेत. राज हे मातोश्रीवर का गेले हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण राज ठाकरे हे मातोश्रीवर कौटुंबिक कारणाने गेले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असणाऱ्या मातोश्रीवर त्यांना अमिताच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेले आहेत. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी का होईना ते मातोश्रीवर जात आहेत.

कौटुंबिक कारणासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले असून सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज आणि उद्धव यांच्यामध्ये काही राजकीय चर्चा यानिमित्ताने होते का बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित २७ जानेवारीला विवाहबद्ध होणार आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांची भेटू घेऊन त्यांना लग्नपत्रिका दिली होती.

राज ठाकरे हे पुढील आठवड्यात राहुल गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यांना देखील राज अमित यांच्या लग्नाची पत्रिका देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींची भेट टाळून राज ठाकरे हे राजकीय संदेश देण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

सोबतच नितीन गडकरी यांनाही ते लग्नपत्रिका देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रिका देणार का याबद्दल मात्र साशंकता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *