सिडनी टेस्ट मॅचमध्ये कोहलीची बॅट आणि ग्लोव्हज गुलाबी का होते?

भारत आणि ऑस्ट्रोलीया संघात टेस्ट मालिका मधला शेवटचा सामना सिडनी मध्ये खेळला जात आहे. पहिल्या दोन दिवसाच्या खेळात या सामन्यावर भारताने वर्चस्व गाजवले आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या मोठ्या शतकी खेळीने भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. या दोघांच्या खेळीव्यतिरिक्त या सामन्याचे अजून एक वैशिष्ट्य राहिले. ते म्हणजे विराट कोहलीची बॅट आणि ग्लोव्हज.

विराटने या सामन्यात फलंदाजी गुलाबी बॅट आणि ग्लोव्हज ने केली. विराटने पहिल्यांदाच वेगळ्या रंगाची बॅट वापरल्याने सर्वाना प्रश्न पडला कि त्याने नेमकी या रंगाची बॅट का घेतली.

या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून ते वाचून तुम्हालाही विराटचा अभिमान वाटेल. भारत आणि ऑस्ट्रोलीयादरम्यान खेळला जात असलेला हा टेस्ट सामना २०१९ मधील पहिलाच टेस्ट सामना आहे. या मॅचमध्ये जे काही पैसे कमावले जातील ते ग्लेन मॅकग्रा फाउंडेशनला दिले जाणार आहेत.

का दिले जाणार हे पैसे?

मैकग्रा फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रोलिया ब्रेस्ट कॅन्सरप्रति लोकांना जागरूक करण्याचं काम करते. या कामाला सपोर्ट देण्यासाठी विराट कोहली गुलाबी रंगाची बॅट घेऊन खेळताना दिसला. गुलाबी रंगाचा जास्त वापर झाल्याने या मॅचला पिंक टेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.

२००९ मध्ये पहिल्यांदा पिंक टेस्ट मॅच खेळण्यात आली होती. सिडनीमध्ये खेळलो जात असलेली हि मॅच ११ वी पिंक टेस्ट मॅच आहे. सिडनी मध्ये नवीन वर्षातील पहिल्या मॅचमधील रक्कम या कामासाठी जमा केली जाते.

ग्लेन मॅकग्रा यांच्या पत्नी ब्रेस्ट कॅन्सर पासून बऱ्या झाल्यानंतर मॅकग्राने या कामाची सुरुवात केली होती. त्यांचे तीन वर्षानंतर निधन झाले होते. कोहलीने या उपक्रमात भाग घेऊन मदत केली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *