आचरेकर सरांवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार का झाले नाही? वाचा एका युवकाची संतप्त प्रतिक्रिया..

सचिन तेंडुलकर सह भारताला अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे गुरु रमाकांत आचरेकर यांचे परवा निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकरसह त्यांचे अनेक शिष्य उपस्थित होते. रमाकांत आचरेकर सरांनी अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले गेले नाही यावरून अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली.

आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जायला हवे होते अशी अनेकांची भावना होती. पण तसे घडले नाही. त्यांच्यावर शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार न केल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईतील एका तरुणाने यावर दिलेली एक प्रतिक्रिया बघूया..

पद्मपुरस्कार प्राप्त , द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, जगातील महान क्रिकेटपटू, भारतरत्न घडवणारे गुरू , अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू भारताला देऊन भारताचे नाव उंचावणारे गुरू रमाकांत आचरेकर सरांवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत यामुळे सरांचं नाव, कर्तृत्व, कीर्ती, आदर कदापि कमी होणार नाही.

अहो ज्या माणसाच्या शेवटच्या प्रवासात अखेर पर्यंत त्यांच्या सर्व शिष्यानी खांदा दिला ( त्यात एका भारतरत्नाचा समावेश आहे ) त्यामुळे शासकीय ईतमामात संस्कार झाले काय आणि नाही याने काय फरक पडतो ?

मुद्दा हा आहे की दारू पिऊन बाथटब मध्ये पडून मेलेल्या एका अभिनेत्री चे अंत्यसंस्कार तुम्ही शासकीय ईतमामात करता का ? तर तिला पद्म पुरस्कार होता प्रोटोकॉल आहे करावं लागतं असं सांगता तिरंग्यात गुंडाळून तिरंग्याचा अपमान करता… मग आज कुठे होता प्रोटोकॉल ?

मी तर म्हणतो आपला तिरंगा ध्वज च दुर्दैवी की त्याला दारू पिऊन मेलेल्या व्यक्तीच्या अंगावर पांघरल गेलं आणि आचरेकर सरांसारख्या सद्गुणी व्यक्तीच्या पार्थिवावर विराजमान होता आलं नाही …

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध, धिक्कार.

-राजे काटे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *