विराट कोहलीला कडकनाथ कोंबडं खाऊ घाला म्हणून थेट BCCI ला पत्र..

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आजच चौथा कसोटी सामना सुरु झाला आहे. चौथा कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याचे भारतीय संघाचे आणि क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न आहे. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ आज संपला तेव्हा भारतच या सामन्यात बाजी मारेल असे दिसत आहे.

भारतीय संघाची यशस्वीपणे धुरा सांभाळणारा विराट कोहली सुद्धा चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मालिकेत चेतेश्वर पुजाऱ्याने ३ शतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा मालिकेत केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

भारतीय संघाला यावर्षी इंग्लंडमध्ये वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंची फिटनेस महत्वाची आहे. फिटनेसमध्ये आहाराची महत्वपूर्ण भूमिका असते. सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडू आहारासाठी सजग असतो. भारताचा कर्णधार विराट कोहली तर व्यायाम आणि आहारावर अधिक भर देतो.

कोहलीबरोबर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आहारावर भर देतात. पण काही संशोधकांनी कोहलीसह भारतीय संघाला नेमके काय खायला हवे, हा सल्ला दिला आहे. मध्यप्रदेश येथील झाबुआ कृषि विज्ञान केंद्राच्या या संशोधकांनी यासंबंधी BCCI ला एक पत्र लिहिले आहे. या सल्ल्यानुसार कोहली आणि भारतीय संघाने ‘कडकनाथ चिकन’ खायला हवे, असे या या संशोधकांनी बीसीसीआयला विनंती केली आहे.

या संशोधकांनी हा नवीन शोध लावला आहे. यानुसार ‘कडकनाथ चिकन’ हे कोहली आणि भारतीय संघासाठी उत्तम असल्याचे म्हटले गेले आहे. या केंद्रातील संशोधकांनी सांगितले की, ” कोहली आणि भारतीय संघासाठी ‘कडकनाथ चिकन’ हा आहारातील उत्तम पर्याय आहे. त्यांनी ‘कडकनाथ चिकन’चे सूप प्यायल्यास त्यांच्या शरीरास ते चांगले असेल. ”

कडकनाथ चिकनचे फायदे काय आहेत फायदे-

साधारण चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट यांचे प्रमाण जास्त असते. हे चिकन खेळाडूंसाठी चांगले नसल्याचे म्हटले जाते. ‘कडकनाथ चिकन’मध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट यांचे प्रमाण कमी आहे, त्याचबरोबर ‘कडकनाथ चिकन’मध्ये प्रोटीन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खेळाडूंसाठी ‘कडकनाथ चिकन’ हे उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *