वाचा कसा लागला दम बिर्याणीचा शोध ? रंजक इतिहास

प्रत्येक वस्तूमागे काहीना काही इतिहास दडलेला असतो. याचा शोध घेतल्यास आपल्याला कळते कि या वस्तूचा इतिहास काय आहे. असाच काही इतिहास दम बिर्याणीचा आहे. आज खासरेवर बघूया दम बिर्याणीचा इतिहास काय आहे.

बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांस वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.

मटन अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.

मांसाहार प्रेमींसाठी दम बिर्याणी म्हणजे मोठी पर्वणीच, या दम बिर्याणीचा शोध मात्र मोठा रंजक आहे. अवध नवाब असिफउद्दोला यांनी साधारण १७८४ साली बडा इमामबाडा या इमारतीचे निर्माण सुरू केले, या इमारत बांधणीच्या समयी कामगारांच्या जेवण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतः कामगार आपले जेवण तयार करत असत. बिर्याणी हा पदार्थ तसा जुनाच पण या बडा इमामबाडा बांधकामावरील कामगारांनी मात्र वाफेचा प्रयोग करून या दम बिर्याणीचा शोध लावला.

नवाब आसिफउद्दोला हे बडा इमामबाडाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी गेले असता ते या बिर्याणीच्या नुसत्या वासाने प्रभावित झाले. नवाब आसिफउद्दोला यांनी लागलीच आपल्या दरबारातील खानसामा म्हणजे राजांचे स्वयंपाकी ( अवधी बावर्ची ज्यांना रकबदार म्हटले जायचे ), यांना या दम बिर्याणीची पाकविधी जाणून घेतला. आणि कितीही म्हटल तरी राजे हे राजेच असतात.

तर त्यांनी हि बिर्याणी काही बदल सुचवून ही दम बिर्याणी वेगळ्या राजेशाही पद्धतीने बनवण्याचा आदेश दिला. साध्या बांधकाम कामगारांचा खाद्य पदार्थ सरळ नवाबाच्या स्वयंपाकघरात पोहचला, आजही अवध किंवा लखनऊची दम बिर्याणी जगप्रसिद्ध आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *