राज ठाकरेंनी कोणाला दिलं अमित ठाकरेच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. राज ठाकरे सध्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मुलाची लग्नपत्रिका सप्तशृंगी देवीचरणी ठेवली होती.

11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता. आता 27 जानेवारीला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. काल राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी अमित ठाकरेची लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण करत आशिर्वाद घेतले.

त्यानंतर राज ठाकरे यांनी लग्नाचं आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. अमितच्या लग्नाचं रतन टाटा यांनी पहिलं आमंत्रण देण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत रतन टाटा यांची भेट घेत त्यांना अमितच्या लग्नाचं आमंत्रण दिलं.

मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान ठिकाणी अमित आणि मितालीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाची पत्रिका अतिशय साध्या स्वरुपात छापण्यात आलेली आहे आणि पत्रिकेवर पुष्पगुच्छ तसेच आहेर आणू नये अशी टीप देखील लिहण्यात आलेली आहे.

राज ठाकरे यांनी अमितचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करणार असल्याचं आधीच सांगितले आहे. त्यामुळे लग्नासाठी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. पाहुण्यांच्या यादीत कोण असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

कोण आहे राज ठाकरेंची सुनबाई-

राज ठाकरेंची होणारी सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले आहे.

अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलंय. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

साध्या पद्धतीने पार पडणार लग्न –

‘अमितचं लग्न साधेपणाने करणार आहोत. मी दोन- तीन महिन्यांपूर्वी सहज आकडा काढला तर हा आकडा माझा पक्ष, इतर पक्ष, सामाजिक संस्था, मित्र- पत्रकार असे मिळून किमान साडे पाच ते सहा लाखांच्या घरात गेला. त्यामुळे सर्वांना लग्नात बोलावणे शक्य नाही. आमच्या हौसेसाठी दाम्पत्याची फरफट करणेही योग्य नाही. माझ्याच पक्षाचा विचार केला तर फक्त मुंबईतील गटाध्यक्षांची संख्याच ११ हजार होती. आता लग्नात ते एकटे येणार नाहीत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही असतीलच, हे सगळं हाताबाहेरचे प्रकरण असल्याने मोजक्या लोकांनाच लग्नाला बोलावणार’, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते .

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *