‘मस्तानी हो गई’ गाण्यावरील अमृता फडणवीस यांचा डान्स बघितला का, बघा व्हिडीओ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्यांची एक सिंगर म्हणून देखील ओळख आहे. त्यांना आपण आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना पाहिलं आहे. अमिताभ यांच्यासोबतही एका अल्बममध्ये आपण त्यांना बघितलं होतं. त्यात त्यांनी अमिताभ यांच्यासोबत डान्सदेखील केला होता.

नुकताच त्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अमृता फडणवीस बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मस्तानी हो गई’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. स्वत: अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. लग्न सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी आपलं नृत्यकौशल्य दाखवलं असून यावेळी त्यांची मुलगी दिविजानेही त्यांना साथ दिली आहे. अमृता फडणवीस यांनी व्हिडीओत दिलेल्या कॅप्शनमधून हे स्पष्ट होत आहे.

त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे. 49 सेकंदाच्या या व्हिडीओत दोघीही न चुकता डान्स करत असून उपस्थित लोकही त्यांना चिअर करताना ऐकू येत आहे.

व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी कॅप्शनमध्ये माझ्या लाडक्या मुलीसोबत कौटुंबिक विवाह संगीत कार्यक्रमात नृत्य सादर करायला मिळाल्याचा आनंद आहे असं लिहिलं आहे.

अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला असून अनेकजण त्यांचं कौतूक करताना दिसत आहेत.

बघा डान्सचा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *