या अपमानाचा बदला घेण्यासाठी टाटा यांनी जगुआर कंपनीच विकत घेतली…

बोलतात ना अपमान हा पुढे बदला घेण्यासाठी बदला घेण्याची भावना भडकवतो. पंरतु महान व्यक्ती आपल्या याच अपमान रुपी कलम ने आपल्या यशाची कहाणी लिहितात. अशीच खूप मनोरंजक कहाणी आहे भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या अपमानाची.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने 1988 साली भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला होता. बाजारात टाटाने आपली पहिली हचबॅक कार इंडिका ला सादर केले होते. परंतु लोकांनी तिला पुर्णपणे नाकारले.

पुढच्या एक वर्षात काहीच विक्री न झाल्यामुळे कंपनीला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. शेवटी रतन टाटा यांनी आपल्या कार डिव्हिजनला विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जगभरातील सर्व कंपन्यांना याचे प्रस्ताव पाठवले. अमेरिकन कंपनी फोर्डने खरेदीमध्ये रस दाखवत रतन टाटा यांना फोर्ड चे मुख्यालयात डेट्रॉयट ला बोलावले.

जेव्हा रतन टाटा कंपनीच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत फोर्डच्या मुख्यालयात पोहचले तेव्हा त्यांच्या प्रति फोर्डची वागणूक अत्यंत अपमानास्पद होती. दीर्घकाळ चर्चेनंतर बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना सल्ला देताना म्हटले की ‘ जर तुम्हाला तुमच्या पेसेंजर कार विषयी काही माहितीच नव्हते तर तुम्ही हा बिझनेस सुरूच का केला. आम्ही याची खरेदी करून तुमच्यावर उपकारच करणार आहोत.

त्यानंतर टाटा यांनी हा करार न करण्याचे ठरवले आणि ते स्वदेशी परतले. वापस येताना प्रवासादरम्यान रतन टाटा खूप उदास आणि भावुक झाले होते. पण पुढे काही दिवसानंतर लोकांनी टाटा यांच्या कारमध्ये रुची दाखवण्यास सुरुवात केली. आणि टाटा हळू हळू जगातील टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील होण्याकडे वाटचाल करू लागली.

या घटनेनंतर जवळपास 9 वर्षांनंतर 2008 साली फोर्ड कंपनीच दिवाळं निघालं. फोर्डचा बहुचर्चित आणि प्रसिद्ध ब्रँड जगुआर आणि लँडरोवर ला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. तेव्हा टाटांनी फोर्डच्या या लक्झरी ब्रँड का खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

बिल फोर्ड यांनी मुंबईमध्ये येऊन 2.3 अरब डॉलरमध्ये ( त्यावेळचे 9300 कोटी) सौदा निश्चित केला. फोर्डने टाटाचं कौतुक करत सांगीतले की, ‘ जगूआर लँडरोवर खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात.’

आहे ना मजेशीर आणि प्रेरणादायी गोष्ट. एकप्रकारे टाटा यांनी आपल्या अपमानाचा बदलाच यातून घेतला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *