छिंदमला मारहाण निघाला शिवसेनेचा स्टंट, छिंदमने जाहीर केली खळबळजनक ऑडिओ क्लिप

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने नगरमध्ये भाजपचा महापौर झाला आहे.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपतून हकालपट्टी झालेल्या श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केलं.

मात्र छिंदमने आपल्याला (शिवसेनेला) मतदान का केलं, या रागातून शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोप दिला. तसंच भाजपनेच छिंदमला आपल्याला मतदान करण्यास बजावल्याचा आरोप शिवसेनेने केला. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी हा आरोप फेटाळला होता.

आता या प्रकरणात खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यामुळे शिवसेनेची दुतोंडी भूमिका समोर आली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने मतासाठी फोन केल्याचा दावा श्रीपाद छिंदम याने केला आहे.

छिंदम आणि बाळासाहेब बोराटे यांच्यातील ऑडिओ क्लिप स्वत: छिंदम यानेच व्हायरल केली आहे. या ऑडिओ क्लीपमधून शिवसेनेनेच छिंदमला अगोदर मत करण्यास विनंती केली आणि नंतर पराभव दिसताच छिदम ला मतदान का केले म्हणून देखील मारहाण केली आहे.

बघा व्हायरल ऑडिओ क्लिप-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *