प्रभू श्री रामांनी वनवासात खाल्लेल्या या फळाविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

कंदमूळ म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे येतात रताळे, बटाटे, इत्यादी परंतु रामकंद किंवा राम कंदमुळ विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. नाशिक भागात हा जास्त करून विकायला असतो. आणि आरोग्यदायी असल्यामुळे आता अनेक शहरात याची विक्री होत आहे. तर आज खासरेवर बघूया राम कंदा विषयी माहिती..

चार ते पाच फुट लांब असलेला हा कंद नारंगी रंगाचा असतो. चित्रकुटच्या जंगलात या कंदमूळाचे मूळ आहे असे लोक सांगतात. चवीला बोरा सारखे गोड असलेले हे फळ आहे. उन्हाळ्यात ह्या कंदाचे सेवन जास्त केल्या जाते. खोडा सारखे दिसणारे हे फळ आहे. हिवाळ्यात राम कंदाचे सेवन करणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. यामुळे आपल्याला अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

राम कंद खाल्ल्याने रातांधळेपणाची समस्या राहत नाही. तुम्हाला ही समस्या असेल तर लवकरच कमी होईल. या समस्येपासून बचाव करण्यासाठी राम कंदाचे सेवन करणे सुरु करा. डोळ्यासंबंधीत सर्व समस्या दूर होतील. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

तुम्हाला हाडांची समस्या असेल तर राम कंद सेवन करावे. यामुळे हाडे मजबूत होतील. हे खाल्ल्याने हृदयाला अनेक पोषकतत्त्व मिळतात. वाढत्या मुलांसाठीही रामकंद फायदेशीर असतात. तुम्ही लंचमध्ये रामकंद खा. यामुळे मुलांची वाढ उत्तर प्रकारे होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *