मातोश्रीवर नमाज पढणारा तो कोण होता?

कालच ‘ठाकरे‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, त्यात एक मुस्लिम व्यक्ती बाळासाहेबांपुढे नमाज पढताना दाखवली गेली. यात बाळासाहेबांपुढे नमाज पढत असलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांचे नाव आहे मेहमूद शेख, वाचा नक्की काय घडले होते…

मेहमूद शेख नावाचे व्यावसाईक काही कामा निमित्त मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी “मातोश्री” वर गेले होते, त्यांचे काम खूप महत्वाचे होते. कारण त्यांच्या कोणत्या तरी जवळच्या नातेवाईकाचे काहीतरी शस्त्रक्रिया की काय ते करायचे होते आणि साहेबांकडे मदत मागायला गेले होते.

तेव्हा त्या डॉक्टरांना बाळासाहेबांनी मातोश्री वर बोलावणे धाडले. तेवढ्यातच नमाजाची वेळ झाली, मेहमूद शेख यांच्या चेहर्यावर दिसत होते कि त्यांना कुठे तरी जायचे आहे. त्यांच्या मनात चलबिचल चालू होती,तेव्हा साहेबांनी विचारले,काय रे? काय झाले ??

तेव्हा मेहमूद शेख म्हणाले ‘काही नाही साहेब’…! साहेब म्हणाले बोल रे, का इतका विचारात पडलास? तर दचकत दचकत ते म्हणाले साहेब ‘नमाजाची’ वेळ झाली, पटकन जाऊन येऊ का? साहेब म्हणाले, अरे त्या डॉक्टरांना बोलावले आहे….. त्यांची तुझी चुकामुक व्हायला नको. साहेब म्हणाले ‘एक काम कर, तू आत मध्ये जाऊन नमाज पड’. देवाला प्रार्थना कुठूनही करा श्रद्धा पाहिजे, ती पोहचते.

साहेबांनी त्यांच्या एका खोलीत जागा साफ करण्यास सांगितले. शेखचे डोळेच चक्रावले, नमाज आणि ‘मातोश्री’ मध्ये ? विश्वास बसत नव्हता त्यांना.त्यांना राहवले नाही, त्यांनी साहेबांना विचारले कि साहेब तुम्ही तर कट्टर ‘हिंदुत्ववादी‘…. मग हे कसे ? तेव्हा साहेब उत्तरले, मी कट्टर #हिंदुत्ववादीच आहे पण तुझ्यासारख्या #राष्ट्रप्रेमी मुसलमानाला मी कधीच विरोध केला नाही. माझा #साबीर_शेख #शिवसेनेच्या सरकार मध्ये मंत्री होता, कारण तो ‘राष्ट्रप्रेमी’ होता.

पाकिस्तान-प्रेमी देशद्रोही मुसलमांना मी लाथा घालणारच आणि ते मी वेळो वेळी दाखवून दिले आहे. राहिली गोष्ट नमाजाची, तर हि तुझी श्रद्धा आहे. ‘मातोश्री‘ मध्ये नमाज पडून, ‘मातोश्री‘ काय अपवित्र झाली नाही आणि ‘मातोश्री’ मध्ये नमाज पडलास म्हणून ते ‘अल्ला‘ पर्यंत पोहचले नाही असे नाही. फक्त ‘राष्ट्प्रेमी‘ राहा, हिंदूंशी प्रेमाने राहा. कुठेही आम्ही ताकदवान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका.

माझा कुठल्याही धर्माला विरोध नाही, मी माणुसकी मानतो. हे आम्हाला महाराजांनी शिकवलंय. मेहमूद शेख यांना गहिवरून आले त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी साहेबांचे #चरण स्पर्श केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *