भारतातील सर्वात कठीण रस्त्यावर महिला ट्रक ड्रायव्हर विषयी आपणास माहिती आहे का ?

जगातील सर्वात कठीण रस्त्यापैकी काही रस्ते भारतातील हिमाचल प्रदेश मध्ये आहेत. जिथे पैदल चालणेही कठीण आहे अश्या ठिकाणी एक महिला ट्रक ड्रायव्हरचे काम करत आहेत. हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील परंतु हि गोष्ट सत्य आहे. या मुलीचे नाव आहे पूनम नेगी तर आज खासरेवर पूनम नेगी विषयी काही खासरे माहिती बघूया..

ड्रायव्हिंग क्षेत्रात पुरुषांचा दबदबा परंतु या चालत आलेल्या परंपरेस मोडून काढत पूनम हे काम करीत आहे. हिमाचल प्रदेश मधील या रस्त्याचे नाव एकताच अनेक ड्रायव्हर या रस्त्यावर जाण्यास नकार देतात. परंतु पूनम येथे अनेक वर्षापासून काम करते. शिमला-किन्नौर हायवेवर ट्रक चालविण्याचे काम पूनम करत आहे. ति सांगते कि तिला लहानपणापासून उंची किंवा कसलीही भीती वाटत नाही. छोट्यातल्या छोट्या रस्त्यावरून आणि घाटातून ती आरामात ट्रक घेऊन जाते.

रामपूर ते रारंग हा रस्ता फक्त १४४ किमीचा आहे परंतु हा रस्ता समुद्रसपाटी पासून ८००० मिटर उंचीवर आहे. आणि संपूर्ण रस्ता एका वेळेस एकच गाडी जाईल असा आहे. पुढून दुसरे वाहन आल्यास बरेच मागे जाऊन साईड देण्यात येते. अश्या रस्त्यावर तिने विक्रमी वेळेत हा प्रवास पूर्ण केलेला आहे. इतकेच नाहीतर रारंगला पोहचल्यावर तिथल्या लोकांनी तिचे स्वागत केले असे ती सांगते.

सोशल मिडीयावरहि पूनमच्या ड्रायविंगचे व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले आहेत. खरदुंगला पास १७,००० मीटर उंचीवर तिने केलेली ड्रायव्हिंग हा व्हिडीओ अतिशय व्हायरल झालेला आहे. आणि हा रस्ता संपूर्ण बर्फाने झाकून असतो.

सुरवातीस तिने हे काम सुरु केल्यावर तिला अनेक लोक हसत होते परंतु आता तिची प्रशंसा करतात. पूनम सध्या सरकारी नौकरीच्या शोधात आहे. तिच्या काकाचे ट्रकसध्या ती चालविते. तिच्या उज्वल भविष्या करिता खासरे कडून तिला शुभेच्छा !

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *