सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडलेल्या बहुप्रतीक्षितीत ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, बघा व्हिडीओ..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास दाखवणारा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षितीत ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज लाँच झाला आहे. ट्रेलर लॉन्च होण्यापूर्वी हा सिनेमा वादात सापडला आहे. सिनेमातील काही दृश्य आणि संवादावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. त्यामुळे ट्रेलर ठरलेल्या वेळेत रिलीज होतो कि नाही याबद्दल साशंकता होती.

ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर चित्रपटाचा ट्रेलर ठरल्याप्रमाणे वेळेतच लॉन्च झाला आहे. संजय राऊत यांनी अगोदरच याबद्दल रोखठोक भूमिका घेतली होती. सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भाषणाची आपली खास शैली होती. बाळासाहेब अनेकदा आपल्या भाषणात शिवराळ भाषेचा वापर करत असे. ‘ठाकरे’ सिनेमातही बाळासाहेबांच्या भाषणाची काही दृश्ये आहेत, त्या भाषेवर सेन्सॉर बोर्डनं आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे.

या सिनेमातील दृश्यांमुळे भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सेन्सॉर बोर्डाने या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेतलेल्या दृश्यात वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणातील काही दृश्यांचा समावेश आहे.

शिवसेना आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात या मुद्द्यांवरुन चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहता सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपांना शिवसेना जुमानणार का? आणि सिनेमातील दृश्यांवर कात्री लागणार का? हे पाहावं लागणार आहे.

हा वाद सुरु असताना ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर आज कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला.

बघा ठाकरे सिनेमाचा ट्रेलर-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *