स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत हंबीरराव मामांची मुलगी आहे या मोठ्या अभिनेत्याची लेक..

संभाजी राजांचा जीवनप्रवास दाखवणारी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका सध्या घराघरात बघितली जाते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.या मालिकेतून सर्वसामान्यांपर्यंत संभाजी राजांचा जीवनप्रवास उत्तमपणे पोहोचवण्यात येत आहे. या मालिकेतून डॉ अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. अमोल कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतले आहेत.

या मालिकेने टीआरपीच्या बाबतीत सध्या सर्वाना मागे टाकले आहे. एकप्रकारे त्यामुळे अमोल कोल्हेना त्यांच्या मेहनतीचे फळच मिळाले आहे. या मालिकेत अनेक प्रसंग अंगावर काटा आणणारे असतात. हि मालिका नवीन पिढीला पुन्हा एकदा इतिहासात घेऊन जाते.

आता याच मालिकेतून कोल्हे यांची दुसरी पिढी देखील या क्षेत्रात पदार्पण करत आहे. डॉ अमोल कोल्हे यांच्या मुलीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यांची मुलगी आद्या हि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे आद्या कोल्हे वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

आद्याने या मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारली आहे. स्वतः अमोल कोल्हे यांनीच सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली आहे.

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमोल कोल्हेंची लेक आद्या आता वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत हिराची महत्वाची भूमिका साकारणार आहे. आद्याची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळे तिनं या भूमिकेसाठी विशेष मेहनतही घेतली आहे.

सर्व प्रेक्षकांना आद्याला बघण्याची उत्सुकता आहेत पण त्यापेक्षा जास्त तिचे वडीलअमोल कोल्हे हे उत्सुक आहेत. हि मालिका चालण्यामागे या मालिकेतील बालकलाकारांच्या भूमिका सुद्धा महत्वपूर्ण राहिल्या आहेत. मालिकेतील सगळ्याच बालकलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्याने हि मालिका सुपरहिट ठरली आहे.

अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी आद्याच्या या मालिकेतील पदार्पणाची माहिती दिली होती. ‘कालपर्यंत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते… एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, हावभाव, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे ‘हे चुकलं’ असं बिनधास्त सांगू शकतो,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.

दरम्यान, आद्याच्या अभिनयाबाबत अमोल कोल्हे उत्सुक असून, बाप-लेकीची ही जोडी प्रेक्षकांना कशी वाटते हे लवकरच समजणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *