१९६१ साली झालेल्या मानाच्या पहिल्याच स्पर्धेत कोण ठरले होते पहिले-वहिले महाराष्ट्र केसरी ?

यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली होती. जालना येथे झालेल्या 62 व्या राज्य कुस्ती स्पर्धेत बाला रफिक शेख या मातीतील पैलवानाने गतविजेत्या अभिजित कटकेला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे.

अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान आहे तर बाला रफिक शेख हा मातीतील पैलवान म्हणून ओळखला जातो. बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला.

खासरेवर आज बघूया पहिले महाराष्ट्र केसरी कोण ठरले होते-

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ‘महाराष्ट्र केसरी’ या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.

१९६१ साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खर्या अर्थाने महाराष्ट्र केसरीचा श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या. औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण २६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यातून ५५० मल्ल सहभागी झाले होते.

मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी ५ सिंह सहभागी झाले होते. यामध्ये नागपूरचे राम अग्यारी, मिरजचे बापू बेलदार, कोल्हापूर( मुळचे सांगली जिल्हा गाव दह्यारी ता. तासगाव) दिनकरराव दह्यारी, मुंबईचे बिरजू यादव आणि वसंत निगडे यांचा समावेश होता. त्यापैकी पैलवान दिनकरराव दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी ठरले होते.

फायनलमध्ये तुटून पडले बिरजू आणि दिनकरराव-

महाराष्ट्र केसरीच्या १९५३,५५,५८,५९ सालच्या स्पर्धा रद्दच झाल्या होत्या. तर १९६० साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्नायीत राहिल्या. त्यामुळे १९६१ मधील या फायनल मधून महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी मिळणार होता.

फायनलमध्ये दिनकरराव आणि बिरजू हे एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले होते. पण अत्यंत चुरशीच्या या कुस्तीत दिनकरराव यांनी बिरजू पैलवानांना अस्मान दाखवले. आणि महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला.

एकपेक्षा अधिक वेळा महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान-

पैलवान गणपतराव खेडकर यांनी २ वेळा, पैलवान चंबा मुतनाळ यांनी २ वेळा, पैलवान लक्षण वडार यांनी ३ वेळा, पैलवान चंद्रहार पाटील २ वेळा, पैलवान नरसिंह यादव ३ वेळा, पैलवान विजय चौधरी ३ वेळा महाराष्ट्र केसरी झाले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *