किडनी खराब होण्या अगोदर शरीरात दिसतात हि लक्षणे..

आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. त्यातील एक निकामी झाल्यास दुसरीवर शरीराचे कार्य चालते. पण थोडे कठीण होते. पण किडनीचा त्रासाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर उपाययोजना करता येतील. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर हे संकेत देण्यास सुरुवात करते. पाहुया कोणती आहेत ती लक्षणे…

१. कधी कधी आपल्या पोटात दुखायला लागत. हे दुखणे पोटाच्या उजव्या किंव्या डाव्या बाजूला असल्यास दुर्लक्ष करू नका. हा किडनीच्या त्रासाचे लक्षण असू शकते.

२. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात हानिकारक पदार्थ साठतात. त्यामुळे आपल्या हाता पायावर सूज येण्यास सुरवात होते. त्याचबरोबर लघवीचा रंग देखील गडद होऊ लागतो. हा रंगातील बदल किडनी समस्येचे लक्षण आहे.

३. कधी कधी लघवी करताना रक्त निघाले तर लवकरात लवकर डॉक्टराकडे जाऊन सल्ला घ्या. हे सुध्दा किडनी खराब होण्याचे लक्षण आहे.

४. आपल्याला लघवी आल्यासारखे वाटेल परंतु बाथरूमला गेल्यास लघवी होणार नाही. हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे.

५. लघवी करताना जळजळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हा युरीन इन्फेक्शनचा संकेत आहे किंवा किडनीची काहीतरी समस्या आहे. यासाठी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६. अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत.

७. लहान सहान कामे केल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास हा हार्मोन्सचे असंतुलन किंवा किडनी फेलचे लक्षण आहे.

वरील माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा कदाचित इतर वाचतील आणि त्यांना याचा फायदा होईल.. आणि पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *