तुमच्या आमदारांना पगार नेमका मिळतो तरी किती?

यावर्षी झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात भरघोस वाढ करण्यात आली होती. या पगारवाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे.

विशेष म्हणजे अनेक मुद्यावर राजकारण केले जाते आणि विधानसभेत आमदार गोंधळ घालतात. पण स्वतःच्या पगारवाढीचा निर्णय मात्र एकमताने मंजूर करण्यात आला होता. या पगारवाढील बच्चू कडू या एकमेव आमदारांनी विरोध केला होता. आपल्या राज्यावर अगोदर कर्जाचा मोठा बोजा आहे. कर्जामुळे विकासकामांना देखील निधी कमी पडत आहे.

विकासकामे नाही झाली तरी चालतील पण आमदारांना भरघोष पगार हवा असच काहीस यातून बघायला मिळतं. आज खासरेवर बघूया या आमदारांना नेमका पगार किती आहे..

राज्यात विधानसभेचे 289 आणि विधानपरिषदेचे 78 आमदार आहेत. लोकसेवक म्हणून विधानसभा आणि विधानपरिषदेवर येणाऱ्या या आमदारांचा पगाराचा आकडा पावणे दोन लाखांच्या वर आहे. आमदारांच्या पगारात टपाल आणि दूरध्वनी सेवेसाठी देखील पैसे जोडलेले असतात. सोबतच त्यांना अनेक भत्ते देखील मिळतात.

महाराष्ट्रावर सध्या जवळपास पाच लाख कोटी रुपयांच्यावर कर्ज आहे. एवढं कर्ज असताना आमदारांच्या पगाराचे आकडे बघून तुमचे डोळे पांढरे होतील.

आमदारांना अगोदर 75 हजार रुपये पगार होता. पण वेतनवाढीनंतर तो 75 हजार रुपयांवरून 1 लाख 86 हजार रुपये झाला. तर आमदारांना पेन्शन म्हणून 50 हजार रुपये मिळतात. मंत्र्यांना 1 लाख 80 हजार ते 2 लाख पगार आहे. राज्यात माजी आमदारांची संख्या 1572 असून त्यांनाही पेन्शन दिले जाते.

आमदारांना नेमके कशासाठी किती रुपये मिळतात-

मूळ वेतन – 67 हजार
महागाई भत्ता – 91 हजार 120 रूपये
संगणक चालकाची सेवा – 10 हजार
दूरध्वनी सुविधा – 8 हजार
टपाल सुविधा – 10 हजार

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *