काळ्या रंगाचं सफरचंद कधी बघितलं आहे का? एकाची किंमत वाचून व्हाल हैराण!

आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते. मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये आणि कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात.

आजपर्यत अनेकदा तुम्ही सफरचंद खाल्लं असेल कदाचित रोज सकाळी तुम्ही एक सफरचंदही खात असाल. डॉक्टर सुद्धा हे फळ खाण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्हाला विचारलं की, तुम्ही किती रंगाचं सफरचंद खाल्लं? तर यावर कुणीही पटकन, लाल, हिरवं आणि हलकं पिवळ्या रंगाचं असं उत्तर मिळू शकतं. पण एक असंही सफरचंद आहे, जे तुम्ही कधी खाल्लंच नसेल. कारण हे जांभळ्या, हलक्या काळ्या रंगाचं सफरचंद फार दुर्मिळ आहे.

आजपर्यंत काळी द्राक्षे तुम्ही पाहिली असतील. पण तुम्ही कधी काळ्या रंगाचं सफरचंद मात्र पाहिलं नसेल. पण असे सफरचंद देखील आहेत. या सफरचंदाला ब्लॅक डायमंड म्हंटले जाते.

या सफरचंदाचं तिबेटच्या डोंगरात उत्पादन घेतलं जातं. या प्रजातीला ‘हुआ नियु’ असं नाव आहे. या सफरचंदाच्या वेगळ्या जांभळ्या रंगाला तिबेटच्या नाइंग-चची परिसराची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे.

चीनची कंपनी Dandong Tianluo Sheng Nong E-Commerce Trade Co. ५० हेक्टर जमिनीवर याची शेती करते. हे शेत समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवर आहे. असे मानतात की, ही सफरचंदच्या शेतीसाठी सर्वात आदर्श जागा आहे.

या ठिकाणावर तापमान दिवसा आणि रात्री फार वेगळं असतं. दिवसा भरपूर सूर्यप्रकाश आणि अल्ट्रा वॉयलट किरणे मिळतात. त्यामुळेच हे सफरचंद गर्द लाल आणि जांभळ्या रंगाचे दिसतात.

या सफरचंदाचं उत्पादन इतर सफरचंदाच्या मुकाबल्यात फार कमी आहे. सामान्य सफरचंदाच्या एका झाडाला परिपक्व होण्यासाठी साधारण २ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो. पण ब्लॅक डायमंडच्या झाडांना मात्र ८ वर्षांचा कालावधी लागतो. त्यातही बागेतील केवळ ३० टक्केच झाडांना फळ येण्याची शक्यता असते. हे सफरचंद साधारणतः १० ते १५ हजार रुपये प्रतिकिलो मिळतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *