आ. बच्चू कडू यांच्या शेतजमीनीचा होणार लिलाव ?

आमदार बच्चू कडू हे नाव नेहमी चर्चेत असते कारण त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आमदाराची पगारवाढीस विरोध, शेतकर्यांच्या मागण्या आणि अपंगाच्या मागण्या आल्या तर बच्चू कडू हे नाव सदा अग्रेसर असते. आमदाराला अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे नेहमी त्यांची प्रशंसा होत होती.

हजारो रुग्णांना मदत करणे इत्यादी उपक्रम बच्चू कडूचे सुरु राहतात. परंतु आर्थिक गणित त्यांचे कधी जुळले नाही. यामुळे अनेकदा त्यांना कर्ज घेण्याचे काम पडले आहे. निवडणुकीत मतदार त्यांच्या करिता पैसे गोळा करून प्रचार करतात हे आपण ऐकलेच असेल. समाजसेवा करताना अनेकदा घरातील वस्तू देखील गहाण टाकणारे अनेक संत या महाराष्ट्राने बघितले आहे.

आमदारांनी देखील आज पर्यंत लाखो लोकांचा मोफत उपचार केलेला आहे. त्याचाच प्रत्यय म्हणावा कि काय त्यांना जनता बँक अमरावती यांनी शेत जमीन जप्तीची नोटीस वृत्तपत्रात छापून पाठवली आहे. आमदार बच्चू कडू त्यांची पत्नी नयना कडू व जमानतदार म्हणून विपिन लिल्हार यांची नावे या नोटीस मध्ये लावण्यात आली आहे.

एकूण २५,५३,१७७ रुपये कर्जाची घेणे रक्कम दाखवलेली आहे. अनेक वर्षापासून कर्जफेड न झाल्याने रक्कम दुप्पट तिप्पट झाली आहे. असे कळविण्यात आले आहे.

शेतातील पिकासोबत त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्यात येईल असे या नोटीस मध्ये लिहण्यात आलेले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *