जिंदगी बदल जायेंगी म्हणून त्याला दिले काम, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लग्नात काढले यांनी फोटो..

भारतात काय सर्व जगातील लोकांना अंबानीच्या लग्नाने तोंडात बोट घातले आहेत. नेहमी या लग्नाविषयी सोशल मिडीयावर काहीना काही चर्चा बघयला किंवा वाचायला मिळतात. आज खासरेवर बघूया अंबानीच्या लग्नात कोणी काढले होते फोटो, आणि कश्या प्रकारे त्याला हे काम देण्यात आले हे चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.

कर्नाटक येथील दावणगेरे येथील वेडिंग फोटोग्राफर विवेक सिकराला व त्याच्या फोटोग्राफरच्या टीमला हायर करण्यात आले होते. फोटो काढण्यासाठी देशातील दोन कंपन्या हायर करण्यात आल्या होत्या. विवेक सिकेरा आणि त्यांचे बिझनेस पार्टनर शंकर काटवे यांनी 2 आणि 3 डिसेंबरपासून ते 8 आणि 9 डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाचेही फोटो काढले. शिवाय 12 डिसेंबरला झालेल्या लग्नाचे फोटो काढण्याची जबाबदारीही या दोघांकडेच होती.

या काळात तब्बल १.२० लाख फोटो त्यांनी काढले आहे तब्बल ३० टीबीचा हा डाटा होता असे ते सांगतात. विवेक सिकरा यांचा आयुष्यात स्ट्रगल हि तसाच आहे कधीकाळी ते पेट्रोल पंपवर काम करायचे. ४७ वर्षीय विवेक सिकरा सांगतात कि त्यांच्या करिता हे एक स्वप्नाप्रमाणेच प्रवास होता. त्यांना हे काम मिळण्या अगोदर सांगण्यात आले होते कि ” जिंदगी बन जायेगी” आणि झालेही तसेच.

सुरवातीला प्रोजेक्ट घेण्या अगोदर त्यांना कोणासाठी फोटो काढायचे हे माहिती नव्हते. आणि हि डील किती मध्ये झाली याबाबत सांगण्याची त्याला परवानगी नाही आहे. त्याच्या कडून अनेक करारावर सह्या घेण्यात आल्या असा तो सांगतो त्यामुळे त्याला बाहेर फी कळविता येत नाही. 1997 साली त्याने स्टुडीओची सुरवात केली आणि आज तो या ठिकाणी येऊन पोहचला आहे.

विवेक सिकराच्या जिद्दीस खासरेचा सलाम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *