राज ठाकरेंचा मुलगा अमित यांची लग्नाची पत्रिका बघितली का ?

राज ठाकरे’ हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मागे त्यांचा मुलगा अमित याचा साखरपुडा मिताली बोरुडे डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

अमित आणि मिताली हे जुने मित्र आहेत. मितालीचे वडील प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे हे आहेत. मिताली आणि उर्वशी ठाकरे ह्या देखील मैत्रिणी आहेत. मागे त्यांनी कपड्याचा एक ब्रांड देखील सुरु केला होता. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे.

हि पत्रिका अतिशय सध्या स्वरुपात छापण्यात आलेली आहे आणि पत्रिकेवर पुष्पगुच्छ तसेच आहेर आणू नये अशी टीप देखील लिहण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या लग्नाकडे लक्ष लागून आहे. यात शंका नाही आहे. पत्रिका मराठीत छापण्यात आली आहे. साखरपुड्याची पत्रिका हि इंग्रजी मधून छापण्यात आली होती.

लग्नाच्या पत्रिकेत लग्नाचे ठिकाण हे सेंट रेन्जीस (९वा मजला) सेनापती बापट मार्ग, लोअर परेल मुंबई इथे हा समारंभ पार पडेल. वर आणि वधूस भावी आयुष्याचा आमच्या खासरेच्या टीम कडून शुभेच्छा !

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *