बीडमध्ये सैराटची पुनरावृत्ती ! हत्या झालेला सुमित वाचू शकला असता, पण…

सैराटमध्ये आर्ची आणि परशा हे आपल्या प्रेमासाठी घरदार सोडून पळून जातात. पण घरच्यांना त्यांचं प्रेम अमान्य असतं आणि त्या दोघांचा खून करण्यात येतो. सैराटची पुनरावृत्ती काल बीडमध्ये झाली. बहिणीसोबत प्रेमप्रकरणानंतर लग्न केले म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा खुन केला आहे.

बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास हा थरार घडला. सुमित वाघमारे (२५ नागोबा गल्ली, बीड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

सुमित आणि भाग्यश्री आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतीम वर्षात शिक्षण घेत होते. या दोघांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम आणि नंतर दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. हा विवाह भाग्यश्रीच्या घरच्यांना मान्य नव्हता. भाग्यश्रीच्या घरच्यांच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा वादही झाले. सुमितच्या घरच्यांना सुद्धा भाग्यश्रीच्या घरच्यांनी त्रास दिला होता.

बुधवारी भाग्यश्रीची परीक्षा होती. भाग्यश्रीचा पेपर झाल्यानंतर सुमित तिला घेण्यासाठी कॉलेजमध्ये आला होता. परीक्षा झाल्यानंतर सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या रंगाच्या कारमधुन (एमएच २३ – ३२५३) भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधुन उतरत सुमिवर धारधार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले.

..तर वाचला असता सुमित-

माध्यमांशी बोलताना सुमितची पत्नी भाग्यश्रीने सांगितले कि जर दोन महिन्यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली असती तर सुमित आज वाचला असता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली नाही असे भाग्यश्रीने सांगितले. सुमित आणि भाग्यश्री दोन महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार देण्यासाठी गेले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *