हिवाळ्यात त्वचा आणि केसाकरिता रामबाण औषध कापूर , वाचा खासरे फायदे..

कापूर म्हटल कि आपल्या डोळ्यापुढे दिसते ती पूजा आणि देव परंतु पूजे व्यतिरिक्त हि कापूर हा अनेक विषयात रामबाण इलाज ठरू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का ? हिवाळ्यात सर्वात जास्त त्वचा आणि केसासंबंधी तक्रार येतात. तसेच कापूर फक्त पूजेत वापरत नाहीतर घरातील माशा, डास किंवा मच्छर जास्त झाल्यास सुध्दा कापूर जाळल्यास मदत होते. पूजेत कापूर वापरण्याचे हे सुध्दा एक वैज्ञानिक कारण आहे.

घरात जास्त मुंग्या झाल्या असतील तर कापूर उपयोगी पडतो. कापराचे पाणी करून ते घरातील कोपऱ्यात फवारणी करा. मुंग्या आपोआप कमी होतील. एवढेच नाही तर गाडीत ढेकुण झाले तर गाडी उन्हात वाळू घाला ती चांगली वाळल्यावर पलंगावर काही कापराच्या वड्या ठेवून गाडी टाका ढेकुण होणार नाहीत.

आंघोळी आधी पाण्यात कापराचे इसेशिअल टाकले तर शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो आणि बॉडी रीलैक्स राहते. घरातील पाळीव प्राणी ज्या कपड्यावर बसतात तिथे कापूर ठेवा त्यांना सुध्दा केसात किडे व्हायचा त्रास होणार नाही. चेहऱ्यावरील तेज वाढविण्याकरिता कच्या दुधात कापराची वडी टाकून चेहरा कापसाच्या बोळ्याने धुवा आणि ५ मिनिटानंतर पाण्याने धुऊन घ्या. चेहऱ्यावर ग्लो येईल.

तुम्हाला किडा चावल्यास तिथे काही इन्फेक्शन झाल्यास किंवा सूज आल्यास कापूर नारळ तेलात मिसळून त्या जागेवर लावा, नक्कीच फरक पडेल. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्याकरिता कापूर व नारळ तेल मिक्स करून रोज पिंपल्सवर सकाळ संध्याकाळ लावा. पिंपल्स सुखून गायब होतील आणि डाग सुध्दा पडणार नाहीत.

केसात कोंडा झाला असेल तर नारळ तेल कोमट करा आणि त्यामध्ये कापूर मिसळवा त्यानंतर त्या मिश्रणाने केसाची मालिश करा. थोड्या वेळाने शाम्पू करा केसातील कोंडा तर कमी होणारच सोबत केसहि अतिशय मजबूत होतील सोबतच . पायाला भेगा पडल्या तरी कापूर कमी येईल , मध कपूर व मिठाचा लेप पायाला लावा. थोडा वेळ पाण्यात कोमट पाण्यात ठेवा त्यानंतर स्क्रब करा व दुधाची साय लावा. भेगा कमी होतील.

जखम झाल्यास त्याचा डाग अनेक दिवस राहतो यावर कपूर लावल्यास तो डाग काही दिवसाने नाहीसा होतो. कापूर एक गुण अनेक आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *