शपथविधीनंतर शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर पहिली सही करणारा पहिला मुख्यमंत्री..

 मध्ये प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर केली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या वचननाम्यात शेतकरी कर्जमाफी हा प्रमुख मुद्दा ठेवला होता. नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खुर्चीवर बसल्यानंतर पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करत आपलं शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे.

कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचे आदेश दिले आहेत. कमलनाथ यांनी मध्ये प्रदेशचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खासरेवर जाणून घेउया कमलनाथ यांचा जीवनप्रवास..

कानपुर मध्ये झाला जन्म-

कमलनाथ यांचा जन्म १८ नोव्हेम्बर १९४६ रोजी उत्तर प्रदेशमधील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानपुर शहरात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडून मधील देन स्कुलमधून झाले. पुढे त्यांनी कोलकाता मधील सेंट झोव्हिअर कॉलजेमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. 

त्यांनी ३४ व्य वर्षी छिंदवाडा मधून पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. कमलनाथ यांचे दिल्लीतील कार्यालय २४ तास कार्यकर्त्यांसाठी खुले असते. निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि सॅटेलाईट फोन वापरणारे खूप कमी नेते आहेत. कमलनाथ हे त्यांच्यापैकी एक आहेत.

संजय गांधी यांच्यासोबत होती खास मैत्री-

कमलनाथ याचं मध्ये प्रदेशसोबत राजकीय नातं आहे. ते राहणारे मात्र पश्चिम बंगालचे आहेत. त्यांची ताकद म्हणजे त्यांचे गांधी कुटुंबासोबत असलेले जवळचे संबंध. संजय गांधी आणि कमलनाथ यांची खास मैत्री होती.  ते दोघे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चांगलेच प्रसिद्ध आहेत. संजय गांधींच्या मृत्यूनंतर ते गांधी कुटुंबाच्या अजून जास्त जवळ आले.

मतदारांमध्ये चांगली इमेज असलेले नेते-

कमलनाथ यांची इमेज खूप चांगली आहे. त्यांचे १९९६ मध्ये हवाला रॅकेट मध्ये नाव आले होते. त्यावेळी ते निवडणूक लढवू शकले नव्हते. त्यांच्या पत्नी अलका यांनी निवडणूक लढवून मोठ्या मतांनी विजय मिळवला होता. 

पुढे एक वर्षातच ते या प्रकरणात निरपराध असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने राजीनामा दिला आणि ते पुन्हा छिंदवाडा मधून विजयी झाले. त्यांचे नाव १९८४ च्या शीख दंगलींमध्ये देखील आले होते. पण कुठलेही आरोप सिद्ध झाले नाही.

छिंदवाडा मध्ये लोकांना दिला रोजगार-

आदिवासी बहुल असलेल्या छिंदवाडा मधील लोकांना कमलनाथ यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार दिला आहे.

कमलनाथ यांना बिझनेस टायकून म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या एकूण २३ कंपन्या आहेत, ज्या त्यांचे २ मुलं सांभाळतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *