या पोलीस महिलेसाठी दुश्मन बनली आहे तिची सुंदरता! लोकं करताय अटक करण्याची विनंती..

महिलांसाठी सुंदरता हा एक मोठा दागिना आहे. सुंदर दिसणे कोणत्याही महिलेला फार आवडते. आजपर्यंत आपण अनेक सुंदर मॉडेल नर्स आणि शिक्षिका बघितल्या आहेत. पण पोलीस महिला कदाचितच बघितली असेल. हि पोलीस महिला इंस्टाग्रामवरील फोटोंमुळे एवढी प्रसिद्ध झाली आहे कि तिची पोलीस म्हणून नोकरीच धोक्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली हि महिला पोलीस अधिकारी तिच्या सुंदरतेमुळे आणि बॉडीमुळे चर्चेत आली आहे. एरव्ही पोलीस म्हणलं कि लोकं थोडे अंतर ठेवूनच राहतात. पण या महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून अटक होण्यासाठी लोकं विनंती करत आहेत. या महिलेकडून अटक होण्यासाठी चक्क नियम देखील तोडले जात आहेत.

जर्मनीची पोलीस अधिकारी एड्रिएन कोलेसजर च्या सुंदरतेने लोकांना मोहून टाकले असून तिला बघण्यासाठी लोकं तिला पुन्हा पुन्हा बघू इच्छितात. एड्रिएन कोलेसजरचे हे फॅन्स तिच्यासमोर खूप जोरात गाडी चालवून ती अटक करेल यासाठी प्रयत्न करत आहेत.

या महिला पोलीस अधिकाऱ्याचे वय अवघे ३१ वर्ष आहे. एड्रिएनचे फॅन्स वाढण्यास इंस्टाग्राम पासून सुरुवात झाली. सोशल मीडियावर लोकं कमेंट आणि मेसेज करून तिला अटक करण्यासाठी विनंती करत आहेत.

बघा तिचे फोटो-

एड्रिएन रोज आपलं जिम मधील वर्कआउट झाल्यानंतर त्याचे फोटो इंस्टाग्रामवर टाकते. तिचे सिक्स पॅक आणि ऍब्सनी लोकांना भावून टाकलं आहे.

ती मागील २ वर्षांपासून इंस्टाग्रामवर आपले फोटो टाकते. या २ वर्षात ती इंस्टाग्रामवर सेन्सेशन बनली आहे. या दोन वर्षात एड्रिएनचे लाखो फॉलोअर्स इंस्टाग्रामवर झाले आहेत.

पण त्यांचा सोशल मीडियावर असलेला ऍक्टिवनेस पोलीस डिपार्टमेंटला आवडलेला नाहीये. तिला चक्क पोलीस डिपार्टमेंटने याविषयी चेतावणी सुद्धा दिली आहे. डिपार्टमेंटने स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि तिने फोटो सोशल मीडियात टाकणे बंद नाही केले तर तिला आपली नोकरी सुद्धा गमवावी लागू शकते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *