बायकोकडून बर्थडे गिफ्ट मिळालेली भारतातील दुसरी टेस्ला सुपर कार रितेशकडे…

रितेश देशमुख आणि जेनेलिया हे बॉलीवूड मधील एक बहुचर्चित असणारं सुप्रसिद्ध जोडपं आहे. त्यांचे फोटो ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातून त्यांच्या प्रेमाविषयी चांगल्या प्रकारे समजू शकतो. आज रितेश देशमुखचा 41 वा वाढदिवस आहे.

आज रितेशला पत्नीकडून काय गिफ्ट मिळालं याविषयी माहिती समोर आलेली नाहीये पण रितेशला मागच्या वाढदिवसाला जेनेलियाने दिलेले गिफ्ट खूपच खास होते.

पतीचा वाढदिवस असणे आणि पत्नीने असे काहीतरी करावे की 40 वर्षाचा माणूस स्वताला 20 वर्षाचा समजायला लागला तर यापेक्षा विशेष बर्थडे गिफ्ट काय असणार. आणि हीच गोष्ट या दोघांच्या बाबतीत घडली होती. जेनेलियाने रितेशला 40 व्या वाढदिवसाला असेच काही खास गिफ्ट दिले होते ज्यामुळे रितेश देशमुख स्वताला 20 वर्षाचा समजू लागला. रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो टाकून या गिफ्टविषयी माहिती दिली होती.

फुल्ल इलेक्ट्रॉनिक कार टेस्ला एक्स हि सुपर कर रितेशला मागच्या वाढदिवसाला गिफ्ट मिळाली होती. रितेशकडे असलेली हि सुपर कर भारतातील दुसरीच कार आहे.

जेनेलियाने रितेशला गिफ्ट दिलेली कार खरच खूप विशेष आहे. त्याने त्यावेळी जेनेलिया विषयी लिहिले होते, ‘मला वाटले मी त्याच गोष्टी करत आहे ज्या मी मागच्या जन्मात केल्या आहेत आणि तुला मिळवले होते कारण मी पुढच्या जन्मात सुद्धा तुच हवीये.’

रितेशचा आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. त्याने 41 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आज त्याला जेनेलिया कडून काय मिळणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जेनेलिया आणि रितेशने 2012 मध्ये लग्न केलं होतं व त्यांना दोन मुले आहेत.

टेस्ला विषयी सांगायची गरज नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रितेशला गिफ्ट मिळालेली कार ही भारतातील फक्त दुसरी टेस्ला कार आहे. यापूर्वी पहिली टेस्ला कार मागील वर्षीच सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी इम्पोर्ट केली होती. कारण टेस्ला अजून भारतात लाँच झाली नाहीये. या कारची सुरवातीची किंमत आहे ५५ लाख रुपया पासून आहे. बातमी वाचल्यानंतर प्रत्येक सिंगल व्यक्ती जेनेलिया सारखी बायको भेटावी म्हणून प्रार्थना करेल.

रितेश सध्या माउली सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पत्नी जेनेलियानेच या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *