रितेश देशमुखचे राजकीय भाषण कधी बघितले आहे का?

बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस. घरून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या अभिनेता रितेश देशमुखने मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

रितेश देशमुखचे वडील दिवंगत विलासराव देशमुख हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषवले. सहसा राजकारण्यांची मुले राजकारणात जातात. पण रितेशने आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 

रितेश देशमुख हा राजकीय स्टेजवर खूप कमी वेळा दिसतो. त्याने २०१४ च्या विधानसभा निवडुकीत पहिल्यांदा राजकीय भाषण केले होते.

बघा रितेशचे पहिले राजकीय भाषण-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *