२६ वर्षीय भारतीय “चहावाली” तरुणी बनली ऑस्ट्रेलियन बिझनेस वूमन ऑफ द इअर..

भारतीयांना उद्योगजगतात प्रत्येक ठिकाणी छाप टाकलेली आहे. परंतु काहीतरी भन्नाट आयडिया घेऊन उद्योग सुरु करणे आणि तो यशस्वी करणे हे तेवढेच कठीण आहे. हे शक्य करून दाखविले २६ वर्षीय तरुणी उपमा वीरदि हि ऑस्ट्रेलियामध्ये तिच्या चहाच्या चवीने सर्वाना मोहून टाकले आहे. आज खासरे वर बघूया तिचा हा प्रवास…

उपमा हि पेशाने वकील आहे तिने या व्यवसायातून वेळ काढून स्वतःची कंपनी सुरु केली “चाय वाली” उद्देश एकच होता भारतीय चहा ऑस्ट्रेलियन लोकापर्यंत पोहचवणे. ऑस्ट्रेलियामध्ये विलायची लवंग अद्रक इत्यादी असलेला चहा कोणी घेत नाही तिने हा विचार करून हा व्यवसाय सुरु केला. आणि बघता बघता तिचा हा व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहचला आहे.

Indian Australian Business and Community Awards (IABCA) तर्फे तिला या वर्षीचा ऑस्ट्रेलियन बिझनेस वूमन हा पुरस्कार सिडनी येथे देण्यात आला आहे.

उपमाने हा चाय वाली व्यवसाय तिचा वकिलीचा व्यवसाय सांभाळून केला. ती सांगते कि तिला हि कला तिच्या आजोबा कडून मिळाली. तिचे आजोबा एक प्रकारे आयुर्वेदिक डॉक्टर होते त्यांनीच तिला हर्बल टी (आयुर्वेदिक चहा) बनवायला शिकवले. उपमाचा हा चहा पियाला ऑस्ट्रेलियन लोक आवडीने येतात.

मूळ भारतीय असलेली उपमा वकील आहे. चंदिगढ येथे तिचा जन्म झालेला आहे. २०१५ साली तिने हा आयुर्वेदिक चहाचा व्यवसाय सुरु केला. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या चहा महोस्तवात ती प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होती. जगाला तिला दाखवून द्यायचे आहे कि भारताचा चहा जगात एक नंबर आहे आणि तिने सध्या हे सिद्ध हि केले आहे.

आता उपमाने एक पाउल पुढे जात चहाचा हा व्यवसाय ऑनलाईन सुध्दा सुरु केला आहे. Chaiwali.com या वेबसाईटवर तुम्हाला तिचे वेगवेगळे उत्पादने बघायला मिळू शकतील जसे मेणबत्ती, चहा चॉकलेट, चहा आईसक्रीम, चहाचे सुंदर भांडे, चहा पत्ती इत्यादी हा चहाचा व्यवसाय तिने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यासोबत ती स्पेशल हर्बल चहा कसा बनवायचा या संबंधित कार्यशाळा सुध्दा घेते.

आहेन भन्नाट आयडिया, खासरे तर्फे उपमाला पुढील यशा करिता शुभेच्छा !
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *