इंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…

उत्‍तर प्रदेशातील दोन युवकांनी इंजिनिअरिंग सोडून चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. सुरूवातीला त्यांनी १ लाख रूपये भांडवल टाकले होते, त्यांनी त्यातून एका वर्षात ७० लाख रूपये कमावले आहेत. अभिनव टंडन आणि प्रमीत शर्मा यांनी हे घवघवीत यश मिळवले आहे.

प्रमित सॉफ्टवेयर इंजीनियर आहे व अभिनव टंडन इलेक्ट्रीकल इंजिनियर आहे. दोघेही देशातील नामांकित कंपनीत लाखोच्या पैकेजवर नौकरी करत होते. अभिनव व प्रमितला शिक्षण सुरु असताना बिझनेसची आवड निर्माण झाली होती.

येथूनच त्यांना नवीन व्यवसाय सुरवात करायची कल्पना आली. परंतु यांना असा व्यवसाय सुरु करायचा होता ज्यामध्ये गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त होईल आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यायचा हा त्यांचा प्रमुख उद्देश होता.

अभिनव सांगतो कि त्याचा बिझनेस पार्टनर प्रमित आणि तो नौकरी करत होता तेव्हा अनेक वेळेस त्यांना टपरीवर शिळा चहा पाजायचे. सोबतच टपरीवर स्वच्छता नसायची. यावेळेस त्यांनी विचार केला कि जर लोकांना स्वच्छ जागा आणि चांगली चहा दिली तर अनेक लोकांना हे आवडल.

काही नवीन करायची प्रबळ इच्छा होती त्यामुळे दोघानेही नौकरी सोडली. आणि आपल्या जमा पैस्यातून १ लाख रुपये गुंतवून नोएडा सेक्टर १६ मध्ये मेट्रो स्टेशन जवळ पहिला टी-स्टॉल सुरु केला. पहिल्या वर्षीच दोघांना जवळपास ७० लाख रुपयाचा नफा आला. चाय कॉलिंग हा त्यांचा ब्रॅण्ड आता ३५ लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो.

चाय कॉलिंग असा चहाचा ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे. हे दोघेही चहाची होम डिलेवरी देतात. वेगवगळ्या १५ फ्लेवरची येथे चहा मिळतो. ५ रुपया पासून २५ रुपया पर्यत या चहाची किंमत आहे. विशेष हे सर्व इको फ्रेंडली आहे पेपर किंवा कुल्लड मध्ये चहा दिला जातो. खाजगी कार्यालयातून त्‍यांच्‍यासोबत अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. आता शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातही त्यांचे ग्राहक आहेत.

‘चहा कॉलिंग’ नावाने त्‍यांनी एका वर्षापूर्वी ९ टी-स्टॉल सुरू केले. त्‍यापैकी ६ बरेलीमध्‍ये तर ३ नोयडामध्‍ये आहेत.या सर्व स्टालच्या माध्‍यमातून त्‍यांनी वर्षभरात ७० लाख रुपयांची कमाई केली. आता देशातील इतरही शहरात टी-स्‍लॉट सुरू करण्‍याची योजना त्यांनी आखली आहे.

त्यांच्या या कार्यास जागतिक चहा दिनानिमित खासरेचा सलाम.. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *