मुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..

मा.मुकेश अंबानी जी
सस्नेह जय जिजाऊ।
आपल्याला आपली लेक ईशा अंबानीच्या लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माननीय मुकेश जी आपण आपल्या लेकीच्या लग्ना निम्मित मनसोक्त खर्च केला ते तर एखाद्या बापाचे मुलींसाठी कर्तव्यच आहे. त्या बद्दल हार्दिक अभिनंदन.

आपण आपल्या लेकीसाठी खूप खर्च केलात त्याबद्दल ही माझी काही तक्रार नाही। पण मुकेश जी आपण भारत नावाच्या गरीब देशात राहतो. ही जाणीव माझ्या सारख्या एका सामान्य भारतीयाला पण केलेल्या भरमसाट खर्च ने पुन्हा पुन्हा जाणीव होते.

आपण मोठे उद्योगपती आहात आणि साक्षात लक्ष्मी आपल्या कडे पाणी भरते या बद्दल ही मला काही देणे घेणे नाही ती कायम आपल्या च घरी असो. पण माझ्या माहिती नुसार आपण जो कोट्यवधींचा खर्च केलात जगातल्या सगळी मोठी लोक पोट भरून जेवलीही असतील. 

पण आपण भारत या देशात राहतो कदाचित आपल्याला कल्पना ही नसेल की किती घरीब लोक उपाशी पोटी झोपतात. असो आपण प्रचंड पैसे कमावतात आणि खर्च पण करतात कधी पत्नीला विमान भेट तर कधी काही. आपण नेहमी पैसे खर्च करण्यासाठी आघाडीवर असतात.

पण आपण राहतो त्या भारत नावाच्या देशात किती मुली बिना लग्नाच्या किंवा पैसे नाहीत म्हणून शिक्षण अपूर्ण राहत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत. असो, आपले नवे जावई ही लक्ष्मी पुत्र च आहेत. त्याबद्द्ल ही अभिनंदन. आपण आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदारी योग्य पार पाडत आहेत.

पण ज्या देशात आपण राहतात. ज्या देशाने आपल्या गरिबीच्या काळात आपली कधी साथ सोडली नाही. ज्या देशाने आपली सर्व उत्पादने नेहमी विकत घेऊन साथ दिली. ज्या देशाने आपले कर्ज अनेकदा माफ ही केले असेल. ज्या देशाने आपल्याला मोठे केले.

मुकेश जी त्या देशासाठी सुध्दा आपण देणे लागत असू ना ? आपण त्याचाही विचार करावा, अशी विनंती करतो. शेवटी आपण जर ठरवलं तर या देशातील इंडिया आणि भारत ही दरी कमी होऊ शकते ना. म्हणून भारतासाठी ही आपण आपल्या संपत्तीचा थोडा वाटा देऊन निदान, अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण, आरोग्य, रोजगार या साठी आपण सहकार्य करावे.

असो, ज्या प्रमाणे बाबासाहेब म्हणाले होते की मी पहिले आणि अंतिम ही भारतीय आहे. असे प्रत्येक भारतीयाला वाटले पाहिजे. म्हणून आपण भारतीयांसाठी ही थोडा का होईना वाटा उचलला ही विनंती.

( ही पोस्ट केवळ मुकेश अंबानी जी साठी नसून या देशातील तमाम धनाढ्य,बलाढ्य,अब्जाधीश, लोकांसाठी असून जे आपल्या संपत्ती चा उपयोग केवळ स्वतःसाठी करत असतील, त्याच्यासाठी आहे)

असो, आपलाच एक भारतीय स्नेही.
विकास पाटील (9420384229)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *