डिलिव्हरीच्या अगोदर जेवणाची चव चाखणाऱ्या त्या डिलिव्हरी बॉयसोबत झोमॅटोने काय केलं?

दोन दिवसांपूर्वी एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डिलिव्हरी  अगोदर आपल्याकडे असलेल्या जेवणावर ताव मारत बसलेला हा बहाद्दर सोशल मीडियामुळे चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

कुणी त्याला ट्रोल करत होते तर कुणी त्याची बाजू घेत होते. काहींचं म्हणणं होतं कि कदाचित ती ऑर्डर रद्द झालेली असेल तर काही म्हणत होते भूक लागली असेल तर खाल्लं तर काय बिघडलं?

झालेला प्रकार चुकीचाच होता. ऑनलाईन फूड ऑर्डर देणाऱ्या या कंपन्यांची पण त्यामध्ये चूक आहेच. त्यांनी पण आपल्या ग्राहकांना त्यांचे जेवण सुरक्षितपणे कसे पोहचेल याची जबाबदारी त्यांची आहे. झोमॅटोला पण यामुळे टीकेचा सामना करावा लागला.

सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर झोमॅटोने तात्काळ या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. झोमॅटोने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये हा व्यक्ती मदुराईचा असल्याचे समोर आले आहे. त्याला तात्काळ काढून टाकण्यात आले.

झोमॅटोने काय सांगितले?

झोमॅटोने त्या व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करत त्याची हकालपट्टी केली असली तरी भविष्यात अशा गोष्टी पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. झोमॅटोने या घटनेनंतर एक ब्लॉगद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

झोमॅटोने या घटनेला दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले. जेवणासोबत झेडछाडीची शक्यता नेहमीच असल्याचे देखील म्हंटले आहे. त्यामुळे भविष्यात अशी छेडछाड केलेले अन्न ग्राहकांना मिळणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

झोमॅटो आता अशी पॅकिंग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये जर अशाप्रकारे छेडछाड केलेली असेल तर ते ग्राहकाला कळेल आणि ते पार्सल स्वीकारण्यास मनाई करू शकतात. सोबतच इतरही सुरक्षेचे उपाय केले जाणार आहेत.

झोमॅटो आपल् १.५ लाख कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग पण देणार असल्याचे सांगितले आहे. हि घटना एकमेव असून खूप धक्कादायक असल्याचे झोमॅटोने म्हंटले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *