मोदी खरोखर ओवेसींच्या पाया पडले का? वाचा या व्हायरल फोटोमागचं सत्यं..

भारतात विनम्रतेला खूप महत्व आहे. आपली संस्कृती मोठ्यांचा आदर करायला शिकवते. एखाद्या मोठ्या व्यक्तीला आदर म्हणून आपण त्याचे दर्शन घेतो तर समवयस्क व्यक्तीला नमस्कार करतो.

सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये मोदी ओवेसी आणि एका शेखच्या पाया पडताना दिसत आहेत. फोटो खूपच आक्षेपार्ह असल्याने हे फोटो शेअर करणाऱ्या एका तरुणावर केस देखील झाली आहे. तरीही हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

या पोस्टमध्ये २ फोटोंना कोलाज करण्यात आले आहे. एकामध्ये मोदी एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसीच्या पाया पडताना दिसत आहेत तर दुसऱ्यात सौदी अरबचे राजा सलमान यांच्या पायाकडे मोदींचे हाथ दिसत आहेत. ओवेसींची नजर मात्र दुसरीकडे आहे.

पोस्ट करणारा व्यक्ती मोदी कोणाकोणाचे पाय धरतात असे म्हणून टीका करत आहे. मोदी समर्थकांना तो चिडवत आहे.

काय आहे सत्यता?

सौदीच्या राजा सोबत जो फोटो व्हायरल झाला आहे तो आताचा नसून २०१५ चा आहे. तो यापूर्वीही अनेकदा व्हायरल झाला आहे. हा फोटो दोन वेगवेगळ्या फोटोना एडिट करून तयार करण्यात आला आहे.

मोदींचा तो पाय पडतानाचा फोटो खरा आहे. मात्र ते अडवाणींच्या पाया पडत आहेत. तो फोटो २०१३ सालीचा असून भोपाळमध्ये एका रॅलीदरम्यान काढण्यात आलेला आहे. मोदी आणि अडवाणी एका स्टेजवर होते. मोदी वाकून अडवाणींच्या पाया पडले मात्र अडवाणींनी त्यांना आशीर्वाद नाही दिला. या फोटोमुळे खूप चर्चा तेव्हा झाली होती.

आपको समझने में आसानी हो, इसके लिए हमने दोनों तस्वीरों को एक फ्रेम में जोड़ दिया है. अब सोचिए कि फ्रेम से नवाज शरीफ और आडवाणी को हटा दिया जाए. फिर मोदी और किंग सलमान को अगल-बगल खड़ा कर दिया जाए, तो देखने में क्या लगेगा? यही न कि मोदी किंग सलमान के पैर छू रहे हैं.

या २ फोटोंना एडिट करून तो व्हायरल झालेला फोटो तयार करण्यात आला आहे.

ओवेसींच्या फोटोच काय आहे सत्य?

यामध्ये पण त्याचप्रमाणे एडिट करण्यात आले आहे. अडवाणींच्या ठिकाणी ओवेसीचा फोटो टाकण्यात आला आहे. तुम्ही दोन्ही फोटो नीट पारखून बघितले तर लक्षात येईल कि दोन्हीचे बॅकग्राउंड एकच आहे आणि मागे उभे लोकपण तेच आहेत. तिथे खाली टेबलवर असलेली पाणी बॉटलपण दोन्ही फोटोत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *