रजनीकांत अशाप्रकारे शिकला हवेत सिगारेट फेकून पेटवण्याची हटके स्टाईल..

सुपरस्टार रजनीकांतचा काल वाढदिवस होता. रजनीकांतचे चाहते त्याचा जन्मदिवस १२ डिसेंबर जागतिक स्टाईल दिन म्हणुन साजरा करतात.जगात सर्वात जास्त चाहता वर्ग असलेल्या या अभनेत्याची प्रत्येक गोष्ट हटके असते. दक्षिण भारतातील त्याचे चाहते तर त्याला देवासारखे मानतात आणि त्याची पूजा करतात.

रजनीकांतने कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळम, बंगाली, हिंदी, इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. त्याने दक्षिणेत सर्वाधिक यशस्वी चित्रपट दिले आहेत. रजनीकांतला रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस अशा नावांनी ओळखले जाते.

रजनीकांत हा अभिनय क्षेत्रात येण्याच्या अगोदर पासूनच आपल्या हटले स्टाईलमुळे ओळखला जायचा. अभिनेता बनण्याच्या अगोदर रजनीकांत हा बस कंडक्टर होता. बसमध्ये बोटांवरुन चिल्लर फिरवण्याच्या करामती, प्रवाशांना ऍक्शनमध्ये तिकीट देऊन झाल्यावर शिट्टी वाजवण्याची वेगळीच शैली होती.

रजनीकांत हा शिवाजी गणेशन या अभिनेत्याची नक्कल करत असे. त्याने डायरेक्टर बालाचंदर यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हि गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी रजनीकांतला एक शिवाजी गणेशन असताना तू नक्कल करून दुसरा कशाला बनतो असे सांगितले. तेव्हापासून रजनीकांत पूर्णपणे बदलला.

रजनीकांत आपल्या सिगरेट पेटवण्याच्या हटके स्टाईलमुळे लवकरच प्रसिद्ध झाला. पण त्याने हि स्टाईल एका सुप्रसिद्ध अभिनेत्याकडून शिकली होती. रजनी यांनी हि स्टाईल शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून शिकली होती. रजनीकांतने सर्वात अगोदर शत्रुघ्न सिन्हा यांना हिंदी सिनेमात अशी स्टाईल करताना बघितले होते.

पण रजनीकांतने त्यात कॉपी करताना अनेक बदल केले. रजनीकांतचे टाईमिंग खूप अचूक असायचं. हि स्टाईल एवढी प्रसिद्ध झाली कि ती पुढे साऊथच्या सर्व मोठ्या अभिनेत्यांनी कॉपी केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *