पाच राज्यांच्या निकालानंतर स्वर्गीय विलासराव देशमुखांचा हा व्हिडीओ झालाय व्हायरल..

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. तीन राज्यात जवळपास काँग्रेसचा स्पष्ट बहुमतासह विजय होईल हे दिसत आहे.

५ राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे. भाजपच्या हातून त्यांची सत्ता असणारी महत्वाची राज्य गमावण्याची वेळ आली आहे. मागील ४ वर्षांपासून चालू असलेली भाजपची विजयी घोडदौड थांबवण्यात काँग्रेसला यश आले आहे.

लोकसभेपासून सुरु  मोदी लाट थोपल्याची भावना लोकांच्या मनात दिसत आहे. मोदी यांनी दिलेली काँग्रेसमुक्त भारतची घोषणा यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. आजच्या विजयाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला चपराक या निकालाद्वारे मिळाली आहे.

स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा एक भाषणाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काँग्रेस भारतातून संपवणं कसं अशक्य आहे याबाबत ते बोलले होते.

बघा व्हिडीओ-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *