शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…

● सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या गोष्टी आपण सरसकट, विचार न करता, खातरजमा न करता, सर्रास पुढे ढकलतो… इतर राज्य आपल्या नेतृत्वाला जपतात. सोबत राहू नका, आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा; पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखल्या जातो त्या नेतृत्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून त्यावर शिंतोडे नका उडवू…!

काय बोलावं कळत नाही, हसावं की रडावं… कोणीही लुंगासुंगा उठतो आणि कुणावर टीका करतो, ही आजच्या सोशल मीडियाची व्यथा… मोदींना कळतं काय शेतीतलं? बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे शक्तिशाली देशाचे नेते आहेत… कुठे काय तुलना करावी? चहावाला कितीही महान असला तरी शेतीवाल्यांच्या व्यथा त्याला कधीही उमगणार नाहीत, हे शेतकऱयांच्या पोरांना कधी कळेल नं सांगेल कोण? काय तर आपलं नेहमीचं अज्ञानमूलक ठोकून द्यायचं – बारामतीच्या पलीकडे कधी पाहिलं नाही!! या माणसाचं दुर्दैव की तो या करंट्या मातीत नं करंट्या लोकांत जन्मला… पवार दुसऱ्या राज्यात जन्माला यायला हवे होते.

● दिल्लीतील एका कार्यक्रमात गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते –
भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग 10 वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले.

● याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत 5 दशक वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौर्‍यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपासी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना उजाळा दिला.

जे महामूर्ख पवारसाहेबांवर जोक करतात त्यांच्यासाठी खाली दिलेली माहिती जरा वाचा आणि मग जोक पुढे पाठवायचा की नाही हे ठरवा…

● युनेस्कोच्या फूड फॉर हंगर ऐवजी कामाच्या मोबदल्यात राशन देण्याचं श्रेय साहेबांना. त्यातून रोजगार हमी उभी राहिली.

● ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 1971 साली बारामती कृषि प्रतिष्ठानची स्थापना केली. पथदर्शी प्रयोग राबवले.

● ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ या सूत्राने बारामती तालुक्यात व नंतर हे मॉडेल राज्यभर नेऊन दूग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.

● यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य .

● दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रोड इन अॅग्रीकल्चर अॅन्ड अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज (सीटा) संस्थेच्या उभारणीत पुढाकार.

● पवार अध्यक्ष झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळांमध्ये मोठी भर.

● विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी, संशोधक तयार व्हावेत, यासाठी रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.

● 1993 पासून शरद पवार प्रसिद्ध नेहरु सेंटरचे अध्यक्ष आहेत. दर 3 वर्षांनी संस्थेचे सदस्य त्यांनाच अध्यक्ष करतात.

● नेहरु तारांगणमधील आधुनिक करण्यात श्री पवारांचा हात, आशियातल्या पहिला विशेष प्रोजेक्टरचा वापर केला.

● केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील तफावत दूर करण्याचं श्रेय पवारांचच.

● आणिबाणीत 50 ते 55 वयाच्या सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पवारांनीच पुन्हा कामावर घेतलं.

● प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनिसांना पवारांनी वेतनवाढ केली. त्यानंतर अद्याप त्यांच्या वेतनात वाढ नाही.

● मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात मोठं योगदान.

● हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे विद्यापीठ.

● सीमाप्रश्न सोडवण्यासाठी बेळगावात मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडला, मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ.

● मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला वलय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान, सध्या हे संकुल मुंबईचा कणा आहे.

● 80च्या दशकात मुंबईच्या समुद्रात नै.तेलाचे साठे आढळले, त्यावर आधारित उद्योग महाराष्ट्रात ठेवण्यात यश.
(आज चहावाला सर्व गुजरातेत पळवत आहे!)

● राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत विदर्भातील बुटीबोरीला उभारली गेली त्याचं श्रेय शरद पवार यांनाच.

● पुण्याच्या आसपास ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उभारणीला शरद पवार यांनीच हात दिला, हा भाग भारताचं डेट्राईट झाला.

● माथाडी मंडळांच्या स्थापनेत शरद पवारांचा सिंहाचा वाटा, दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना मोलाची मदत.

● माथाडी कामगारांच्या घरांसाठी शरद पवारांनी वडाळा-चेंबूरमध्ये 42 एकर जमीन दिली, काही वादामुळे 18 एकरच मिळाली.

● शरद पवारांनी नवी मुंबईच्या कोपर खैरणेत सिडकोकडून 5 हजार घरं बांधून ती माथाडी कामगारांना दिली.

● केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी माथाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ करून घेतला.

● माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना 1999 पासून शरद पवार यांनी जावळीतून वेळोवेळी उमेदवारी दिली.

● रमेश वांजळे यांच्या मृत्यूनंतर मनसेसह सर्व पक्षांनी त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. पवारांनी त्यांच्या पत्नीला खासदारकीची उमेदवारी दिली. आज वांजळेंची 18 वर्षांची कन्या वारजे-माळवाडीची नगरसेवक आहे.

● चातुर्वण्य हेच देशातील पहिले आरक्षण असल्याची मांडणी शरद पवार यांनी केली.

● इंदिराजींच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती निवळण्यात शरद पवार यांचं महत्त्वाचं योगदान.

● पंजाब शांत करणारा ‘राजीव-लोंगोवाल करार’ प्रत्यक्षात आणण्यामागे शरद पवार यांचे महत्त्वाचे प्रयत्न.

● 1989 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना.

● शऱद पवार यांची खेळाशी नाळ कधीही तुटली नाही. कुशल क्रीडा संघटक अशी त्यांची आजही ओळख आहे.

● राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असताना लाल मातीसोबतच गादीवरील कुस्तीला शरद पवार यांनी सुरुवात केली.

● देशातील सर्वश्रेष्ठ अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली.

● खो-खो खेळासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शरद पवार यांचा वाढदिवस खो-खो दिवस म्हणून साजरा केला जातो.

● 1990 साली बिजिंगमधील एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला तो शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे.

● 1993 साली पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन, त्यावेळी 11 महिन्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीची उभारणी केली.

● संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शाहीर अमर शेख यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्याची कल्पना शरद पवारांनीच उचलून धरली.

● साहित्यिक आणि कलावंतांमध्ये रमणारा राजकारणी अशी शरद पवार यांची खरी ओळख आहे.

● सहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय शरद पवार यांचाच.

● कवी ना.धों. महानोर, लक्ष्मण माने यासारख्या साहित्यिकांचा विधान परिषद प्रवेश शरद पवार यांच्यामुळेच झाला.

● अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अनेक अडचणींतून सोडवलं, यशवंत नाट्यगृह उभारण्यात मोलाची मदत.

● घाशीराम कोतवाल नाटकाच्या बंदीविरोधात शरद पवार ठाम उभे राहिले. सतीश आळेकरांनी याविषयी भरभरुन लिहिलंय.

● 1988 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी भटक्या-विमुक्तांना घरे बांधण्यासाठी पुण्यात 140 एकर जमीन मंजूर केली.

● 1990 मध्ये शरद पवारांनी फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा यशस्वी कार्यक्रम केंद्र सरकारनेही स्वीकारला.

● प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ एम.एस.स्वामीनाथन श्री. पवार यांचा गौरव फलोत्पादन क्रांतीचे जनक असा करतात.

● पवार मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी केरळने निधी देण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने ती जबाबदारी घेतली.

● शरद पवार यांनी पैठणला संतपीठाची घोषणा केली, 17 एकर जमीनही दिली. मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदानंतर काहीच घडलं नाही.

● शरद पवार यांनी शाहू-फुले-आंबेडकरांचं लिखाण प्रकाशित करण्यासाठी समित्या स्थापन केल्या, संकलित साहित्य प्रकाशित केलं.

● महाराष्ट्रासाठी 3 वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाला.

● राजकीय आकसापोटी पवारांच्या संकल्पनेतील एन्रॉन प्रकल्पाला विरोधकांनी विरोध केला. याची किंमत महाराष्ट्र आजही चुकवत आहे.

● महिलांना सैन्यदलात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरंक्षणमंत्री शरद पवार यांनी घेतला. लष्करात महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं.

● लातूरच्या किल्लारी भूकंपावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाला तोड नाही, 3 महिने तळ ठोकून होते. त्यामुळेच भूज भूकंपात तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागणीवरून शरद पवार हे केंद्राच्या आपत्कालीन मदत व्यवस्थेचे प्रमुख होते.

● स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आणि राज्य महिला आयोग स्थापन करण्यात योगदान.

● अर्थसंकल्पात आदिवासींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करण्याचा निर्णय, पवारांचा हा निर्णय केंद्रानेही राबवला.

● कृषी क्षेत्रातील शरद पवार यांच्या कामगिरीबद्दल संयुक्त पुरोगामी सरकारने शेवटच्या बैठकीत अभिनंदनपर प्रस्ताव मांडला.

● दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून देश आज शरद पवार यांच्याकडे गौरवाने पाहतो.

● गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भारताने जी यशस्वी झेप घेतली ती तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात.

● कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं.* 3 कोटी 69 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.
(करतंय का आज मोदीचं महाराष्ट्रातील पिल्लू?)

● शेती कर्जावरचा 12 टक्क्यांचा व्याजदर शरद पवार यांनीच टप्प्याटप्प्याने 4 टक्क्यांवर आणला.

1 comment

  1. Really nice article.Notable He is great no doubt.One should explore more on his lifetime idols. At least before making any allergetic comment .Should take care about the personality and it’s dedications made towards nation. So please follow some thouts before making. Salute to SAHEBJI on the event of his Birthday. Regards.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *