DYSP सुरज गुरव यांच्या केबिनमध्ये लावलेला फलक सर्व काही सांगून जातो !

कोल्हापूरमधील एका पोलीस अधिकाऱ्यावर काल दिवसभर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झालेला बघायला मिळाला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना या अधिकाऱ्याने खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हे अधिकारी होते DYSP सुरज गुरव.

काल सोशल मीडियावर आणि इतर सर्वत्र त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती. DYSP सुरज गुरव यांनी या दोन्ही आमदारांना महापालिकेत जाण्यास मज्जाव केला त्यानंतर त्यांच्यात आणि गुरव यांच्यामध्ये बाचाबाची झाली. 

त्यावेळी ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. असे खडे बोल गुरव यांनी सुनावले.

आज सोशल मीडियावर पुन्हा एकदा गुरव यांच्या केबिनमध्ये लावलेला फलक व्हायरल झाला आहे. बघूया असे काय लिहिले आहे या फलकावर..

मी धर्म मनात नाही कर्म मानतो. देव मानतो, पण देवापेक्षाही माणुसकीला मानतो. मी शिवाजीराजांना आणि त्यांच्या स्वाभिमानाला मानतो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या शिक्षणाला व घटनेला मानतो. मी पैगंबराच्या शिकवणुकीला आणि कुराणला मानतो.

पण मी मनात नाही जातीपातीला, खोटारड्या, दांभिक व भोंदू माणसांना, जुमानत नाही बदमाशांना, बेइमानाला आणि समाजविरोधी कृत्य करणाऱ्याला, आणि महत्वाचं… घाबरत तर मुळीच नाही.. समाजकंटकाला, त्यांच्या एकीच्या दबावाला आणि त्यांच्या स्वार्थी हेतूला.

मी मानतो कायद्याला आणि त्याच्या न्यायाच्या बाजूला. मी मानतो नेहमीच कायद्यानं मानणाऱ्यांना आणि पालन करणाऱ्यांना. मी आदर करतो स्त्रियांचा, वृद्धांचा आणि होतकरू तरुणांचा आणि स्वार्थ न ठेवता समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा..

कारण मी सेवक आहे, प्रशासक आहे.. खूप महत्वाचं.. सर्वात महत्वाचं.. मी एक “पोलीस” आहे…
सुरज गुरव (उपविभागीय पोलीस अधिकारी) ‘

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *