गडचिरोलीत बदलीची धमकी देणाऱ्या माजी मंत्र्याला वर्दीवर जायचं नाही म्हणत DYSP ने सुनावलं..

”गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही.आम्ही नोकरी करतोय राजकारण करत नाही. सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”, असे खडे बोल कोल्हापूरचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावले आहेत.

कोल्हापूर महापालिकेत आज महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. त्यानिमित्ताने महापालिकेला छावणीचे स्वरूप आले होते. या निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेत येत होते. त्यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना अडवले.

महापालिकेत जाण्यास मज्जाव केल्याने मुश्रीफ आणि गुरव यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यादरम्यान आक्रमक झालेल्या मुश्रीफ यांना बदलीला घाबरत नसल्याचे बोलत खडे बोल सुनावले आहेत. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या घटनेचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

बघा व्हिडीओ-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *