मराठ्यांच्या मुलींनी तमाशात नाचा अशी भाषा करणाऱ्या लक्ष्मण मानेंना पूजा झोळेचे खुले पत्र…

लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी सादर करणाराची आणि लावणी रसिकांचीही आजवर कोणी जात काढली नव्हती. लक्ष्मण मानेने ती ही कसर भरून काढली. पुर्वी पाटील गावातील वतनदार आणि धनिक असल्याने त्यांनी लावणीला उदारहस्ते आश्रय दिला असला तरी लावणी बघुन फेटे उडवणारे फक्त पाटीलच नव्हते.

सर्वच जाती धर्मातील लोकांना लावणीमध्ये आपला विरंगुळा सापडत असे. लावणी वर नृत्य करणे हा विशिष्ट जातीचा पिढीजात पेशा असला तरी ते काही सामाजिक बंधन नव्हतं की अमुक जातीनेच लावणीवर नाचलं पाहिजे आणि अमुक जातीनेच फेटे उडवत दौलतजादा केली पाहिजे.आणि आता बदललेल्या काळात तर लावणीवर कोणीही नृत्य करतंलक्ष्मण मानेच्या आजच्या विधानातून त्याचा महाराष्ट्राच्या या गौरवशाली लोककलेबद्दलचा संकुचित आणि मागास दृष्टिकोन दिसुन आलेला आहे.

तसेच स्त्रियांना तुच्छ आणि जातीय अस्मितेचे सिम्बॉल मानण्याची गलिच्छ पुरुषी वृत्ती ही दिसून आलेली आहे ..आणि सोबतच पराकोटीचा मराठाद्वेष… उपराकार आज साहित्य रसिकांच्या मनातुन उतरला तो कायमचाच..

आपली भारतीय संस्कृती हि मातृ सत्ताक आहे न याचा संदेश भारताने पूर्ण जगाला दिला,माँ साहेब जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवराय घडले…परंतु आज याच संस्कृतीचा घटक असलेल्या काही माता-भगिनी नाईलाजास्तव, काही पर्याय नसताना उदरनिवाहासाठी तमाशा तसेच एकत्र काम करत आहेत.

तर अश्या तळागाळातल्या स्त्रियांना सबल बनवावं त्यांना कुठेतरी यातून बाहेर काढून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात, हीच एका जबाबदार न राजकारणात असलेल्या लोकप्रतिनिधींच कर्तव्य असावं, पण बेजबाबदार, वाचाळ अश्या आमदार लक्ष्मण माने यांनी तर स्त्रियांना या नरकातुन बाहेर काढण्यापेक्षा उलट स्त्रियांना माझ्याकडे पाठवून द्या मी त्यांना लावणी शिकवतो त्यांनी तामाश्यात नाचल पाहिजे हे नशेच्या भरात वक्तव्य केलं.

ज्या छत्रपतींच्या दरबारात परस्त्री हि मते समान होती त्यांच्या या शिकवणीला आमदार माने यांनी कुठंतरी काळिमा फासायच काम केलं आहे,कुठं तरी स्त्री यांबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या भावना या वक्तव्याने समोर आल्या आहेत,बोलताना त्यांनी मराठा मुलींचा,महिलांचा उल्लेख केला एक लक्ष्यात घ्या महिला कि कोणत्याही जाती धर्माची असो तिचा मान, सन्मान हा झालंच पाहिजे ही मराठा समाजाची एक शिकवण आहे त्यामुळं मराठा तर सोडाच परंतु इतर कोणत्याही जाती धर्मातील स्त्री यांबद्दल असं वक्तव्य केल्यास याद राखा.

ज्या सुप्रिया ताई आज मुलींसाठी स्त्री यांसाठी एवढं तळमळीने काम करतात,त्यांच्याच तुकड्यावर मोठा झालेल्या या माने नि असं वक्तव्य करून ताईंच्या विचारांचा न कार्याचा अपमान केला आहे या बाबतीत सुप्रिया ताईनी पण ठोस काहीतरी कारवाही करावी नाहीतर आम्ही आहोतच…

आणि आमदार मानेला खुल आव्हान, ते पण एक मराठा समाजची मुलगी म्हणून करते, ज्या मराठा समाजातील मुलींना तू तमाशा शिकवणार होतास ना चल आता फक्त तू आमच्या समोर येऊन दाखव  बघुत मग किती तुझ्या शब्दात दम आहे ते, मराठा समाज हा दिलेल्या शब्दला जगतो आणि तोच शब्द मला पूर्ण करायचा आहे तर तु ये समोर मग तुला दाखवते मराठा मुलगी काय असते ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *