अभिनेते धर्मेंद्र यांचे हे काही खास किस्से खूप कमी लोकांना माहिती असतील !

8 डिसेंबर 1935 रोजी पंजाब मध्ये जन्मलेले सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे.

अभिनेता गोविंदा हा धर्मेंद्र यांचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा गोविंदाची पत्नी गरोदर होती तेव्हा त्याने पत्नीला धर्मेंद्र यांचा फोटो दिला होता, जेणेकरून त्यांचा होणारा मुलगा धर्मेंद्र यांच्यासारखा सुंदर व्हावा. ही गोष्ट जेव्हा धर्मेंद्र यांना समजली होती तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते.

जितेंद्र आणि हेमा मालिनी लग्न करणार होते पण धर्मेंद्र यांनी जीतेंद्र यांच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड विषयी माहिती उघड करून त्यांचे लग्न मोडले होते.

शोलेमध्ये धर्मेंद्रला ठाकुरचा रोल करायचा होता पण दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची इच्छा होती की त्याने विरुचा रोल करावा. धर्मेंद्र ऐकत नव्हते म्हणून सिप्पी यांनी त्यांना संजीव कुमारला विरु बनवण्याची धमकी दिली होती. विरु हेमा मालिनीचा हिरो असल्याने त्यांनी लगेच तो रोल स्वीकारला.

शोलेच्या शूटिंग दरम्यान धर्मेंद्र मुद्दाम चूका करायचे जेणेकरून त्यांना हेमा मालिनीसोबत जास्त वेळ घालवायला मिळायचा. ते स्पॉट बॉयला पण चूका करण्याचे पैसे द्यायचे.

धर्मेंद्र यांनी 80 आणि 90 च्या दशकात ऍक्शनच्या भूमिका निभावल्या. त्यांचा ‘कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे.

धर्मेंद्र यांना टाइम्स मॅगझीनने जगातील सर्वात सुंदर 10 पुरुषांच्या यादीत स्थान दिले होते.

धर्मेंद्र यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते पण त्यांना एकदाही हा पुरस्कार मिळाला नाही. त्यांनी फिल्मफेअर लाईफटाइम अचिवमेंट अवॉर्ड दरम्यान सांगितले होते की त्यांनी अवॉर्ड स्वीकारण्यासाठी नवीन सूट शिवला होता पण अवॉर्डच नाही मिळाला.

धर्मेंद्र 70 च्या दशकात सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *