मोदींनी स्वतः तिकीट दिलेल्या सावित्रीबाई फुलेंनी दिला भाजपच्या खासदारकीचा राजीनामा..

‘भाजप दलितविरोधी आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची देशात अनेक ठिकाणी विटंबना झाली, पण भाजपने दोषींवर कारवाई केली नाही. भाजपचे बडे नेते देशाची घटना बदलण्याची भाषा करतात, पण आजपर्यंत खासगी क्षेत्रात एससी-एसटींसाठी आरक्षण लागू करण्याचं आश्वासन पूर्ण केलं नाही,’ असे आरोप करत भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सावित्रीबाई फुले या यूपीतल्या बहराइच मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजप समाजात फूट पाडण्याचा कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासरेवर जाणून घेऊया कोण आहेत सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाई फुले या लहानपणापासूनच विद्रोही स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षीच लग्न झाले होते. पण त्यांनी सासरला जाण्यास नकार दिला. त्यांच्या नांदण्यास नकारामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या बहिणीचे लग्न त्या व्यक्तीशी करून दिले. त्यांच्या डोक्यात लहानपणी पासूनच समाजसेवेचं वेड होतं.

त्यासोबतच त्यांना राजकारण देखील आवडायचे. शाळेत असताना त्यांना एक स्टायपेंड आला होता. पण तो प्रिन्सिपलने हडपला. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांना स्टायपेंड तर नाही मिळाला पण शाळेतून नाव मात्र काढून टाकण्यात आले. त्यांनी पुढे सन्यास घेतला.

बहराइचच्या नानपारा मधील हुसैनपुर मृदांगी गावात सावित्रीबाई फुलेंचे १ जानेवारी १९८१ पासून आयुष्य बदलत गेले. कांशीनाथ यांचे जवळचे असलेले अक्षयवरनाथ कनौजिया हे त्यांचे गुरु होते.

१९९५ मध्ये मायावती मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमासाठी बहराईचला आल्या होत्या. या कार्यक्रमात १४ वर्षाच्या सावित्रीबाईंचे देखील भाषण झाले होते. त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. मायावतींनी त्यांना आपल्या पक्षात घेत सक्रिय राजकारणात उतरवले.

पुढे ३ वर्षांनी मायावतींनी १९९८ मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकले. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी बसपाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजय मिळवला. पुढे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. २००२ आणि २००७ साली पराभव झाल्यानंतर २०१२ ला त्या आमदार झाल्या.

२०१४ ला त्यांचे भाग्य पुन्हा उजळले आणि त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्या तब्बल १ लाखापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवत खासदार झाल्या. त्यांना तिकीट देखील थेट मोदींनी दिले होते. त्यांनी तिकीट मागितले तेव्हा मोदींनी बहराईचच काय गुजरात मधून विजयी करण्याचे बोलले होते.

खासदार झाल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या स्टाईलने भाजपवर शाब्दिक हल्ले चढवले. त्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिल्या. आता थेट भाजपचा राजीनामा देऊन त्यांनी बंड पुकारले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *