मिनटात घालवा दाताचे पिवळेपण,दात एवढे पांढरेशुभ्र होतील की लोकं बघतच राहतील

प्रत्येक व्यक्तीला त्याचा चेहरा सुंदर असावा असे नेहमी वाटते. अनेक सौंदर्य संपन्न व्यक्ती त्यांच्या चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतात. पण इथेच एक मोठी चूक माणसाकडून घडते. कारण चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांचे देखणेपणही तेवढेच महत्वाचे असते हे ते विसरून जातात.

लहानपनापासूनच सर्वाना दात घासायला कंटाळा येत असतो, हा कंटाळा अत्यंत चिंतेचा विषय असतो. कारण आरोग्याची सुरुवात ही मुखरोग्यपासून होत असते.

प्रत्येकाच्या दाताबाबत अधिक समस्या असतात. दात किडने, दात पिवळे पडणे दात दुखणे या सर्व समस्याचे मूळ एकच आहे दात ना घासणे. याव्यतिरिक्त काही पदार्थांचे जास्त सेवन, वाढते वय किंवा औषधींची जास्त डोस केल्यास दात पिवळे होऊ शकतात.

जाणून घेऊया पिवळे दात मिनिटातच पांढरेशुभ्र करणाऱ्या काही खास टिप्स आज खासरेवर .

1.तुळस-

तुळशी ही एक अतिशय महत्वपूर्ण औषधी वनस्पती आहे. तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणाला दूर करण्यासाठी अद्भुत क्षमता असते. तुळशीचे पानं वाळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील.तुळस ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. ही वनस्पती वातावरण शुद्ध राखतेच तसेच आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते.

2.मीठ –

मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा (लाकडापासून तयार केलेला कोळसा) मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो.

3.संत्र्याची साल –

संत्र्याची साल आणि तुळशीचे पानं वळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. ब्रश केल्यांनतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा. संत्रीमधील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियममुळे दात मोत्यासारखे पांढरे दिसतील.

4.गाजर –

दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास यामधील रेशे दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात.
गाजराच्या बाबतीत एक गोष्ट खास आहे कि ते वर्षभर बाजारात उपलब्ध असतात.गाजर आपण सलाड म्हणून हि खाऊ शकतो व भाजी बनवून हि खाऊ शकतो.

5.लिंब –

लिंबाचा उपयोग प्राचीन काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. लिंबामध्ये दात पांढरे करणारे आणि बॅक्टेरिया नष्ट करणारे गुण आढळून येतात. हे एक नैसर्गिक अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक आहे. दररोज लिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे कोणतेही आजार होत नाहीत. वाळलेल्या लिंबाच्या सालांची पूड करून ठेवून घ्या. याला दिवसातून एकवेळा दातांवर चोळा. दात चमकायला लागतील.

6.लिंबू –

लिंबू हे एक असे फळ आहे, ज्यामुळे तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते. यामुळे हे दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. एका लिंबाचा रस काढून त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळून घ्यावे. जेवण केल्यानंतर या पाण्याने गुळणा करा. या उपायने दात पांढरे होतील आणि तोंडातील दुर्गंधी दूर होईल. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून दातांची मसाज करा.

7.स्ट्रॉबेरी –

स्ट्रॉबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आढळून येणारे मॅलिक एसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा.

8.केळ –

केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा. दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.पण केळाच्या बाबतीत एक धोका असा पण आहे कि आपण जर केल जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्या दातांमध्ये कीड लागू शकते.

9.टोमॅटो –

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोचा रस दातांसाठी खूप चांगला असतो. टोमॅटोच्या रसाने दातांवर मसाज केल्यानंतर थोड्यावेळाने ब्रश करा. या उपायने दात पांढरेशुभ्र होतील.

10.सफरचंद –

सफरचंद दातांवर स्क्रब करण्याचे काम करते. त्याशिवाय सफरचंदात मैलिक अ‍ॅसिड असते, त्यामुळे दात चमकदार होतात. सफरचंदाचे सेवन केल्याने जीवाणूंचा परिणाम होत नाही आणि श्‍वासाचा दुर्गंध येत नाही. त्यामुळे मुलांना रोज एक सफरचंद खायला द्यावे. दात चमकतीलच; पण पोटासंबंधीचे सर्व विकार दूर होण्यास मदत होते.

11.टरबूज-

लोह, मॅग्नशिअम, कॅल्शिअम, मॅगनीज, झिंक, पोटॅशिअम आणि आयोडिन यासारख्या पोषक घटकांनी युक्त टरबूज दातांसाठी फायदेशीर असते. मुलांचे दात चमकदार करायचे असतील, तर त्यांना टरबूज अवश्य द्यावे.

12.आक्रोड व बदाम –

सुकामेवा मुलांना अवश्य द्यायला हवा. त्याचे आरोग्यासाठी फायदे आहेतच. त्याशिवाय आक्रोड आणि बदाम खाल्ल्याने दातांवर जमा झालेले प्लाक किंवा कीटण साफ होते आणि दातांचा पिवळेपणाही दूर होतो.

तर या आहेत मिनिटामध्ये दात चकाचक करण्याच्या घरगुती टिप्स माहिती आवडल्यास शेअर करा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *