१०7 वर्षाच्या सर्वात वयोवृद्ध युट्युबर मस्तनम्मानी घेतला जगाचा निरोप..

सर्वात वयोवृद्ध युट्युबर मस्तनम्माला यांनी काल जगाचा निरोप घेतला. त्याची सर्वात वयोवृद्ध युट्युबर अशी ओळख होती. कंट्री फूड नावाचे युट्युब चैनल आता तुफान प्रसिद्ध आहे. या चैनलच्या यशाचे श्रेय मस्तनम्माला जाते ! मस्तनम्मा विषयी थोडक्यात माहिती आज आपण खासरेवर बघूया…

मस्तनम्मा आंध्रपदेश मधील गुंटूर जिल्हातील गुदिवाडा या छोट्याश्या खेड्यातील रहिवासी होत्या. २०१६ च्या अगोदर तिचे आयुष्य अगदी साधारण होते. २००,३०० रुपये रोजाने ती आपल्या मुलासोबत शेतात काम करत असे. कमवले तर खायला मिळेल अशी तिची परिस्थिती होती. परंतु अचानक एक दिवस तिचा नातू लक्ष्मण याच्या मुळे अगदी परिस्थिती बदलली.तिचा नातू लक्ष्मण हा ग्राफिक्स डिझाईनचा कोर्स केलेला आहे. त्याने काही चैनल मध्ये काम सुध्दा केले. एक दिवस तो मित्र सोबत घरी आला आणि आजीला वांग्याचे भरीत बनविण्यास सांगितले त्याने हा व्हिडीओ शूट केला आणि युट्युबवर ऑगस्ट २०१६ला अपलोड केला. आणि बघतो तर काय हा व्हिडीओ भयंकर वायरल झाला होता.

लक्ष्मण सोबत या वेळेस त्याचा मित्र श्रीनाथ रेड्डी हा देखील होता. व्हिडीओ तब्बल काही दिवसातच ७५ लाख लोकांनी बघितला होता. बाहुबली पेक्षाही तिचा व्हिडीओ जास्त लोकांनी बघितला. त्यानंतर या दोघांनी कंट्री फूड नावाचे एक युट्युब चैनल चालू केले. आणि त्याला रोज लाखो लोक बघतात. मस्तनम्मा जन्म कोपाले या गावी झाला होता. परंतु तिला एका मुस्लीम कुटुंबाने दत्तक घेतले होते कारण त्यांना मुलगी नव्हती. परंतु तिला नवीन परीवार आवडला नाही ती परत आपल्या मुळ घरी परत आली. तिचे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी करण्यात आली परंतु भूषणम हा तिचा नवरा फार जास्त काळ जगू शकला नाही. लग्नानंतर काही वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर मस्तनम्माच्या पाठीमागे ४ मुले व १ मुलगी एवढा परिवार होता. सर्व मुलांपैकी तिचा मुलगा डेविड हा सध्या जिवंत आहे.

डेविडची मुलगी राजश्री सध्या मस्तनम्मा सोबत व्हिडीओ मध्ये काम करताना दिसते. तिच्या १०६ व्या वाढदिवसाला १० एप्रिल ला तिला संपूर्ण जगातून भेटवस्तू मिळाल्या. मस्तनम्माला दात नाही एका अपघातात तिने आपले दात गमविले परंतु याचा तिच्या आहारावर कुठलाही परिणाम झाला नाही. तिला खाण्यापेक्षा खाऊ घालणे आवडायचे. जंगलात किंवा शेतात शूट सम्पल्यावर आजूबाजूच्या लोकांना ती खायला बोलवत असे. ती ज्या ठिकाणी काम करायची तिथे इंटरनेट कनेक्टीवीटी नव्हती. शूट झाल्यानंतर शहरात जाऊ न हा व्हिडीओ अपलोड करण्यात येत असे. लवकरच लोणच्याचे विविध प्रकार बाजार विकण्यास आणायचा त्यांचा मानस होता.

वैन्काया नायडू सारखे मोठे मोठे लोक आता या खेड्यास भेट देण्यास येतात. मस्तनम्मा मुळे तिचे गावही प्रसिद्ध झाले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *