जगातील सर्वात महागड्या दारु व त्यांच्या किमती तुम्हाला माहिती आहेत का?

आनंदाचे क्षण असो दुःखाचे माणसाच्या दोन्ही क्षणाला आजकाल एक गोष्ट सोबत असते, ती म्हणजे दारू. माणूस मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दारू पितो किंवा काही दुःख विसरायचे असेल तरी दारू पितो. असे बोलले जाते की दारू जितकी जुनी असेल तितकीच ती महाग असते. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या दारूविषयी आणि त्यांच्या किमतीविषयी माहीती देणार आहोत. काहींच्या किमती लाखामध्ये तर काहींच्या कोटीमध्ये आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटू देऊ नका.

जगातील सर्वश्रेष्ठ व्हिस्की अनेक दशकांपासून जपून ठेवण्यात आल्या आहेत ज्या की सध्याच्या काळात सर्वात महागड्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही व्हिस्कीबद्दल सांगणार आहोत ज्या फक्त मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये, किंवा व्यावसायिक घरांचे वैभव वाढवतात.

1. ईसोबेलाज इसले- 4 कोटी रूपये

ही आहे जगातील सर्वात महागडी व्हिस्की. या व्हिस्कीची किंमत 6.2 मिलियन डॉलर किंवा 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या व्हिस्कीची बॉटल खूपच आकर्षक असते. ईसोबेलाज इसले ची बॉटल 8500 हिऱ्यांनी सजलेली आहे. या बॉटलमध्ये पांढऱ्या सोन्याच्या कारागीरिसह 300 रुबलसुद्धा जोडलेले आहेत. यावरून तुम्हाला कळलेच असेल की ना तरी बाटली दुकानात मिळते ना सामान्य माणूस हे मद्य पिऊ शकतो.”

2. मैक्लेन 1946- 2 कोटी 89 लाख रुपये

मैक्लेन 1946 ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी व्हिस्की आहे. सध्या या व्हिस्कीची किंमत 460000 डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा हि जास्त आहे. ही व्हिस्की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी बनवण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस कोळशाच्या किंमतीवर लागलेल्या बंदीमुळे व्हिस्कीची निर्मिती जो ला हरवून करण्यात आली होती. याच कारणामुळे ही व्हिस्की सर्वात महागड्या व्हिस्कीपैकी एक म्हणून ओळखले जाते.

3.डेल्मोर (62 वर्ष जुनी)- 1 कोटी रुपये

डेल्मोर ही जगातील सर्वात मोठ्या लक्झरी ब्रँड पैकी एक आहे. डेल्मोर 2011 सली चर्चेचा विषय होती कारण डेल्मोर ने आपली एक 62 वर्षे जुनी बाटली 200000 डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी 32 लाख रुपयांस विकली होती.

4. मास्टर ऑफ मॉल्ट ( 105 वर्षे जुनी)- 92 लाख रुपये

स्कॉटलंड च्या डाल्मोर डिस्टलरी मध्ये बनणारी मास्टर ऑफ मॉल्ट ही एक खूप जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. 105 वर्षे जुनी असलेल्या या व्हिस्कीला 17 फेब्रुवारी 1906 ला हायलेंड मधल्या ईस्ला टोरटेन डिस्टलरी मध्ये बनवण्यात आले होते. सध्याच्या घडीला तिची किंमत 1.4 मिलियन डॉलर म्हणजेच 92 लाखापेक्षा जास्त आहे.

5. गेनफिडीच जेनेट शीड रॉबर्ट रिजर्व (1955)- 62 लाख रुपये

गेनफिडीच जेनेट शीड रॉबर्ट रिजर्व (1955) ही महागड्या व्हिस्कीच्या लिस्ट मध्ये सामील आहे. सध्या तिची किंमत 94000 डॉलर म्हणजेच जवळपास 62 लाख रुपये आहे. या व्हिस्की ला 1955 च्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन च्या दरम्यान बनवण्यात आले होते. ही व्हिस्की तिच्या फ्लोरल, फ्रुटी आणि गोड चवीसाठी विशेष प्रसिध्द आहे.

6. डालमोर 62 सिंगल हायलेंड मॉल्ट स्कॉच मैथेसन- 40 लाख रुपये

डालमोर 62 सिंगल हायलेंड मॉल्ट स्कॉच मैथेसन मध्ये 4 वेगवेगळ्या व्हिस्कीचे मिश्रण आहे. सध्या तिची किंमत 58000 डॉलर म्हणजेच जवळपास 40 लाख रुपये आहे. 1942 मध्ये ही व्हिस्की बनवण्यात आली होती. या व्हिस्कीचे नाव डालमोर राज्याचे मालक अलेक्झांडर मैथेसेन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 2005 साली या व्हिस्कीची निलामी करण्यात आली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *